Sillod News : सुरेश बनकर यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

सिल्लोड : पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून स्वागत
Sillod News
Sillod News : सुरेश बनकर यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती file photo
Published on
Updated on

Suresh Bankar appointed as BJP District President

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : येथील सुरेश बनकर यांची भाजपच्या छत्रपती संभाजीनगर (पूर्व) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

Sillod News
Temperature rise : सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटचा चटका

शुक्रवारी (दि. १८) पक्षाच्या वरिष्ठांनी सुरेश बनकर यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी या आधी प्रदेश सचिव, सिल्लोड- सोयगाव विधानसभा प्रमुख यासह अनेक पदे भूषविलेली असून पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. वडील पांडुरंग बनकर यांच्यापासून बनकर कुटुंब भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहे.

जिल्ह्यासह सिल्लोड - सोयगाव मतदार संघाचा त्यांना चांगला राजकीय अभ्यास आहे. सुरेश बनकर यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ५ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. तर सिल्लोड, सोयगाव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री अतुल सावे, आ. अनुराधा चव्हाण, आ. सुहास सिरसाठ, आ. प्रशांत बंब, जिल्हा परिषदचे अध्यक्ष अविनाश गलांडे, उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, माजी आ. सांडू पा. लोखंडे, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, किसान मोर्चाचे मकरंद कोर्डे,

Sillod News
English-medium schools : इंग्रजी शाळांना स्वतंत्र एसओपी आणि संरक्षण कायदा लागू करा

व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, जिल्हा चिटणीस कमलेश कटारिया, राजेंद्र जैस्वाल, माजी सभापती अशोक गरुड, जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई काळे, राधाकृष्ण काकडे, डॉ. सचिन वाघ, ज्ञानेश्वर तायडे, विजय वानखेडे, अनिल खरात, दत्ता बडक, नारायण खोमणे, एकनाथ हिवाळे, आत्माराम पाडळे, अंकुश कोठाळे, सारंगधर जैवळ, शुभम अन्वीकर, द्वारकादास पंडित, गणेश भूमकर, स्वप्नील शिंगारे, नारायण बडक आदींनी अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत बावनकुळे, राणे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू. पक्ष बांधणी, संघटनावर भर देत व केंद्र, राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आगामी काळात करू.
सुरेश बनकर जिल्हाध्यक्ष, भाजपा छत्रपती संभाजीनगर (पूर्व)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news