छत्रपती संभाजीनगरात नायलॉन मांजामुळे 'पीएसआय'चा गळा चिरला

गळा चिरल्याने मोठा रक्तस्राव, रुग्णालयात उपचार सुरू
nylon manja, Chhatrapati Sambhaji Nagar
छत्रपती संभाजीनगर- पोलिस उपनिरीक्षकाचा नायलॉन मांजाने गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(file photo)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुचाकीने ड्युटीवर निघालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा नायलॉन मांजाने गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी सुधाकर नगर, सातारा परिसरात घडली. गळा चिरल्याने मोठा रक्तस्राव झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दीपक पारधे असे जखमी उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दीपक पारधे हे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. सकाळी ते ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. सातारा परिसरातील सुधाकर नगर भागात त्याच्या गळ्यात अचानक नायलॉन मांजा अडकला. यात पारधे हे मांजामुळे लटकले गेले. गळा चिरल्याने मोठा रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सातारा ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली. पोलिस सध्या घटनास्थळी गेले असून नायलॉन मांजा लावून पतंग उडविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलिस अधीक्षक रुग्णालयात

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड आणि अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी रुग्णालयात धाव घेतली.

nylon manja, Chhatrapati Sambhaji Nagar
नागपुरात १८ लाखांच्या नायलॉन मांजावर पोलिसांनी फिरवला बुलडोजर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news