पैठण येथे वाल्मीक कराडच्या समर्थकांचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध

जरांगे- पाटील, क्षीरसागर, धस यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
Sakal Maratha Samaj agitation
पैठण येथे मनोज जरांगे-पाटील , संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. Pudhari Photo
Published on
Updated on

पैठण, पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या प्रतिमेची वाल्मीक कराड यांच्या समर्थकांनी विटंबना केली. या प्रकरणाचा पैठण येथे आज (दि.१५) सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी मनोज जरांगे, क्षीरसागर, धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी अनिल राऊत, पवन शिसोदे, सुभाष नवथर, साईनाथ कर्डिले, महेश पवार, हरिभाऊ शेळके, शिवाजी साबळे, संतोष गोबरे, शेखर देशमुख, एकनाथ भाकरे, किशोर दसपुते, उमेश तट्टू, अंकुश काळे, पिंटू आरगडे, प्रशांत देशमुख, गणेश पवार, अमोल हिंगले, संतोष निवारे, गुड्डू जाधव, कडूबा तांगडे, पिनू कर्डिले, जिजा कर्डिले, गोकुळ पठाडे, अभिजित निर्मळ, भीष्मराज पवार आदी उपस्थित होते.

Sakal Maratha Samaj agitation
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या; पैठण येथे आक्रोश मोर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news