Sambhajinagar News : महागडा नाश्ता, चहा, जेवणाचा ठराव स्थगित

सभापतींनी दिले सुधारित प्रस्तावाचे आदेश, सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationFile Photo
Published on
Updated on

Proposal for expensive breakfast, tea, and meals Suspended

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या स्थायी समिती, विषय समिती आणि सर्वसाधारण सभांसाठी चहा, नाश्ता आणि भोजन व्यवस्था करण्यात येते. यासाठी दरवर्षी केटर्सची नियुक्ती केली जाते. परंतु यंदा त्यासाठी देण्यात आलेला दर पाहून आवक् झालेले सदस्य राजगौरव वानखेडे आणि अॅड. माधुरी अधवंत यांनी गुरुवारी (दि. ३०) स्थायी समिती सभेत प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. सदस्यांचा संताप पाहून सभापती अनिल मकरिये यांनी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Mahavitaran News : कडा भवनची जागा वीज उपकेंद्रांसाठी उपलब्ध

महापालिकेची स्थायी समिती सभा गुरुवारी चांगलीच वादळी ठरली. महागड्या जेवणासह शहरातील खड्डेमय रस्ते, चोकअप ड्रेनेज यावरून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच कोंडी धरले होते. या सभेत महापालिकेच्या भांडार विभागाने जेवण, नाश्ता, चहा, पाण्याची बॉटल यासंदर्भातील खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. यात नाश्ता प्रतिप्लेट ७० रुपये, कपभर चहा ३८ रुपये (कप बशीसह), तर बिस्कीटचे पाकीट १८ रुपये एवढेच नव्हे तर व्हेज जेवणाची थाळी थेट ५९० रुपयांमध्ये, २०० एमएल पाण्याची बॉटल सात रुपयांमध्ये देण्याबाबतचा ठराव मंजुरीस्तव ठेवण्यात आला होता. हे दर पाहून सदस्य आवक झाले.

सर्वांनी या दर निश्चितीच्या ठरवावर आक्षेप घेतला. सुरेंद्र कुलकर्णी, राजगौरव वानखेडे, अॅड. माधुरी अदवंत यांनी प्रशासनाला धारेवर धरत शहरातील पंचतारांकित हॉटेलच्या दराप्रमाणेच हे व आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Sambhajinagar News : मुख्य बसस्थानक बनले वाहनतळ

ही दरसूची कोठून आणली? याचा खुलास करावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. रुपयांना चहा तोही कपबशीसह मग कपबश नगरसेवकांना देणार का? असा टोला लगावल त्यावर सुधारित प्रस्ताव पुढच्या बैठकीत साव करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

ई-निविदा करणार

महागड्या दरसूचीसंदर्भात खुलासा करताना अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे म्हणाल्या की, हे दर शहरातील बाजारपेठेतून घेतले आहेत. या दरानुसार खर्चाला मंजुरी मिळाल्यानंतर ई-निवादा प्रक्रिया राबविली जणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news