शिक्षण मंत्रालयाच्या चित्ररथ निर्मितीत सिल्लोडचे प्रा. कुमावत यांचा सहभाग

नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर प्रजा-सत्ताकदिनी सादर झालेल्या शिक्षण मंत्रालयाच्या चित्ररथातून भारताच्या ज्ञानपरंपरेचा आर्यभट्टांच्या शून्यापासून डिजिटल युगातील स्मार्ट वर्गखोल्यांपर्यंतचा प्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला.
sillod news
शिक्षण मंत्रालयाच्या चित्ररथ निर्मितीत सिल्लोडचे प्रा. कुमावत यांचा सहभागfile photo
Published on
Updated on

Prof. Kumawat of Sillod participates in the production of the Chitrarath of the Ministry of Education

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर प्रजा-सत्ताकदिनी सादर झालेल्या शिक्षण मंत्रालयाच्या चित्ररथातून भारताच्या ज्ञानपरंपरेचा आर्यभट्टांच्या शून्यापासून डिजिटल युगातील स्मार्ट वर्गखोल्यांपर्यंतचा प्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला.

sillod news
निखिल चव्हाण यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांची सभा

मप्राचीन मुळे, डिजिटल पंखफ या संकल्पनेवर आधारित या चित्ररथाच्या निर्मितीत सिल्लोड येथील प्रा. प्रदीप कुमावत यांचा असल्याने तालुक्यातून अभिमान व्यक्त केला जात आहे. सहभाग मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. डॉ. विजय सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्ररथ साकारण्यात आला.

चित्र रथाच्या अग्रभागी आर्यभट्टांचे शिल्प, विद्यार्थ्यांची ज्ञानभरारी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील संकल्पना, खेळावर आधारित व मातृभाषेतून शिक्षण, अनुभवात्मक शिक्षण, कला-क्रीडा सहभाग, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण जाणीव तसेच विकसित भारत २०४७ची दिशा प्रभावीपणे दर्शवण्यात आली आहे.

sillod news
इंग्रजी शाळांच्या प्रश्नांवर मेस्टाचा एल्गार !

सुमारे तीन ते चार महिने चाललेल्या या निर्मिती प्रक्रियेत ४० ते ६० कलाकार, आजी-माजी विद्यार्थी व तंत्रज्ञ सहभागी होते. कुलगुरू हिम चॅटर्जी, कुलसचिव शशिकांत काकडे, सिल्लोडचे प्रा. प्रदीप कुमावत तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे आजी-माजी विद्यार्थी यांनी संकल्पनेला सुसूत्र रूप दिले. डॉ. किशोर इंगळे, कला संचालक, महाराष्ट्र राज्य यांचेही मार्गदर्शन लाभले. कर्तव्यपथावर साकारलेल्या या चित्ररथाने भारताच्या शिक्षणविषयक दृष्टीकोनाचे प्रभावी दर्शन घडवले असून, या ऐतिहासिक निर्मितीत सहभागामुळे सिल्लोडच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news