Shri Krishna Janmashtami : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शोभायात्रा लक्षवेधी

सजीव देखावा, लाठीकाठीसह मुदगलच्या मर्दानी कवायती ठरल्या आकर्षण
Shri Krishna Janmashtami
Shri Krishna Janmashtami : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शोभायात्रा लक्षवेधीfile photo
Published on
Updated on

Procession marking Shri Krishna Janmashtami draws attention

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की च्या अखंड जयघोषात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री नंदवंशी अहीर गवळी समाज व अहीर युवा संघटनेच्या वतीने शनिवारी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील कृष्ण-रुक्मिणीचा सजीव देखावा आणि लाठी-काठीसह मुदगल फिरवत तरुणांनी सादर केलेल्या मर्दानी कवायती विशेष लक्षवेधी ठरल्या.

Shri Krishna Janmashtami
ST Bus smart card : एसटीच्या स्मार्ट कार्डवरील चुकांचा प्रवाशांना भुर्दंड

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त यंदाही फकीरवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात २ ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत 'श्रीमद् भागवत कथा सप्ताह' व विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी जन्मा-ष्टमीनिमित्त मंदिरात महापूजेनंतर सकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजलेल्या मुख्य रथात श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान होती.

तर दुसऱ्या रथात श्रीकृष्ण-रुक्मिणीचा सजीव देखावाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता श्रीकृष्णाचा जयघोष करत समाजबांधव मोठ्या संख्येने रथयात्रेत सहभागी झाले. ही रथयात्रा अंगुरीबाग, जाधवमंडी, श्री संस्थान गणपती, सराफा रोड, सिटीचौक, गुलमंडी मार्गे पुन्हा फकीरवाडी मंदिरात सांगता झाली. सांयकाळी रामचरित्र व श्रीकृष्ण जन्मोत्सव भागवत कथा भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली-

Shri Krishna Janmashtami
Corporators Disqualification Case : मनपात आज ९ नगरसेवकांच्या अपात्रतेवर सुनावणी

आज रुक्मिणी स्वयंवर, उद्या कथेची सांगता

२ सप्टेंबर रोजी कलश यात्रेपासून श्रीमद् भागवत कथेचा ज्ञानयज्ञ अत्यंत भक्तीमय वातावरणात सुरू आहे. आज सोमवारी रुक्मिणी स्वयंवर कथा होणार असून, उद्या मंगळवारी सुदामा चरित्राने सप्ताहाची सांगता होणार आहे. भागवत कथेसाठी दररोज समाज बांधव व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news