

छत्रपती संभाजीनगर : जागेच्या वादातून प्रमोद पाडसवान यांची निघृण हत्याप्रकरणी निमोणे कुटुंबातील सहा आरोपींनंतर आता पोलिसांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या शाखा प्रमुखासह गणेश मंडळाच्या एका सदस्यालाही गव्हाड (४४) असे शाखा प्रमुखाचे नाव असून, तो शिवराज क्रीडा मंडळाचा संस्थापक अध्यक्षही आहे. तर त्याच्याच मंडळाचा सदस्य मंगेश गजानन वाघ (२७, दोघेही रा. सिडको एन-६) यालाही अटक झाली. दरम्यान, दोघांना मंगळवारी (दि. २६) न्यायालयात हजर केले असता ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
यापूर्वी हत्याप्रकरणी आरोपी काशिनाथ निमोणे, त्याची पत्नी शशिकला काशिनाथ निमोणे, मुलगा ज्ञानेश्वर काशिनाथ निमोणे, गौरव काशीनाथ निमोणे, सौरव काशीनाथ निमोणे आणि जावई मनोज दानवे यांना यापूर्वीच अटक झाली आहे. तर मुलगी जयश्री फरार झाली आहे. गुन्ह्यात आरोपींची संख्या ९ झाली आहे. सिडको एन-६ भागातील संभाजी कॉलनीत शुक्रवारी (दि.२२) निमोणे कुटुंबातील सहा जणांनी मिळून पाडसवान कुटुंबावर खुनी हल्ला करून प्रमोद यांची निघृण हत्या केली होती. या हल्ल्यात प्रमोद यांचे वडील रमेश हे गंभीर जखमी झाले आहेत. तर यांचा मुलगा रुद्र व आई मंदाबाईही जखमी झाले होते. निमोणे कुटुंबातील सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. घराची झडती घेऊन धारदार चाकू, लाकडी दांडे, २ लोखंडी रॉड, एक लोखंडी पहार व चाकूचे दोन कव्हर जप्त करण्यात आले आहेत. सोमवारी कुटुंबीयांचे जबाब घेताच त्यात ठाकरे गटाचा शाखाप्रमुख अरुण गव्हाड आणि मंडळाचा सदस्य मंगेश वाघचे नाव समोर आले. भांडण व हत्येवेळी दोघे तिथे निमोणेसोबत असल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली. निमोणेची बहीण जयश्री दानवे हिचेही आरोपींमध्ये नाव समाविष्ट केले आहे. मात्र ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, अरुण गव्हाड हा राजकीय नेत्यांच्या नावाने पाडसवान कुटुंबीयांना 1 निमोणेच्या आडून धमक्या देत होता. निमोणे कुटुंबाला पुढे करून हा वाद पेटविण्यात आला. तर मंगेश वाघ मंडळाचा सदस्य व निमोणेचा मित्र असून, तो नेहमी निमोणे बंधूंसोबत राहायचा. तो एका रुग्णलयात वार्ड बॉय म्हणून काम करतो.
हत्येच्या दिवशी सकाळी खडी व ढोल काढण्यावरून वाद झाला तेव्हा गव्हाड आणि वाघ हेही 2 घटनास्थळी निमोणे कुटुंबासोबत धावून आले होते. त्यांनीच प्रमोद पाडसवान यांच्या कुटुंबावर खुनी हल्ला व हत्येसाठी चिथावणी देऊन मारण्यासाठी मदत केल्याचे तपासात पोलिसांनी समोर आणले. या गुन्ह्यात बीएनएस ४९ आणि शस्त्र अधिनियम ४ (२५) कलम वाढविले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रमोद पाडसवान यांची हत्या झाली तेव्हा घटनास्थळी आरोपी व पकडणाऱ्या, तिथे उपस्थित असणाऱ्या २७जणांचा काय सहभाग आहे, याचा सायबर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून तपास केला जात आहे. गरज पडली तर काहींना चौकशीसाठीही ताब्यात घेतले जाणार आहे.
सिकडो पोलिस ठाण्यात पाडसवान कुटुंबाने निमोणेविरुद्ध दिलेल्या ३० तक्रारींचा गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याने सध्याच्या नऊ आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत. तसेच फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीनेही घटनास्थळी असलेले पुरावे जमा केलेले आहेत.