

Pramod Padaswan Murder Case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जागेच्या वादातून प्रमोद पाडसवान यांची निघृण हत्या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर निमोणेला शुक्रवारी (दि.२९) घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी पोलिस संभाजी कॉलनीत घेऊन आले होते. कॉलनीत दहशत करून हत्या करणारा निमोणे हातात हातकडी घालून पोलिसांनी आणताच बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे ज्ञानेश्वर मान खाली घालून चालत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर निमोणेचे घर व त्यासमोर त्याचा गायीचा गोठा आहे. प्रमोद यांच्या हत्येवेळी वापरलेले शस्त्र शोधण्यासाठी पोलिस त्याला घेऊन घरी आले होते. सुमारे अर्धा ते पाऊणतास त्याला हातात बेड्या ठोकून पोलिस घर-ाजवळ शोध घेत होते. या संपूर्ण वेळेत त्याने एकदाही मान वर करून पाहिले नाही.
त्यानंतर दिवसभर याच प्रकरणाची कॉलनीमध्ये चर्चा होती. यात निमोणेच्या घरातून एक दांडा जप्त करण्यात आल्याची माहिती निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. तर शनिवारी सर्व आठ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, त्याची बहीण जयश्रीचा अद्यापही शोध लागलेला नाही. गुन्हे शाखेची पथके तिच्या मागावर आहेत.