

Prahar Jan Shakti movement
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा
माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थनात प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी तहसीलदार परिसरात खाली मुंडके वर पाय आंदोलन करून शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणूण गेला होता.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, दिव्यांग क्रांतीचे अनिल मैद, शिवबा संघटनेचे देविदास पाठे, रावसाहेब टेके, दादासाहेब पाचपुते, संकेत मैराळ, संदीप शेळके, अमोल वायसळ, नंदकुमार बागल, सतीश चव्हाण, रमेश खर्डे, रशीद शेख यांनी जोरदार निदर्शने केली. निवेदनात असे म्हटले आहे की, २०२४ निवडणुकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी, दिव्यांगांना ६ हजार मानधन, शेतीमालाला हमीभाव किमतीवर २० टक्के अनुदान, शेतीची सर्व कामे मनरेगामधून व्हावी या सह सतरा मागण्यांसाठी बच्चू भाऊ यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
कडू यांच्या मागण्या रास्त व वाजवी आहेत. आपण त्याच आश्वासनावर निवडणुका जिंकल्या आहेत, पण जन-तेने आपल्यावर विश्वास ठेवून मत दिल्याने आपण बहुमताने सत्तेत आहात याचा आपल्याला बहुतेक विसर पडलेला दिसतो.
बच्चूभाऊ हे शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, कामगार यांचे श्रद्धास्थान आदर्श आहेत त्यामुळे आपण त्यांच्या प्रकृतीची काळजी करून तातडीने मागण्या मान्य करून अन्नत्याग आंदोलन स्थगित करावे अन्यथा आता महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग पेटून उठलेला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करून सरकार म्हणून आपल्याला जाग येत नसेल तर आम्हाला आमच्या नेत्याच्या जीवासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा पवित्रा आंदोलकतयाँनी घेतला. यावेळी देशमुख, अवधूत नजन, देविदास शाह, तुकाराम प्रकाश पारखे, अण्णा वायसळ, अमोल सूर्यवंशी, इस्माईल कोहळे, रामनाथ भागवतसह प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
१५ जून रोजी चक्काजाम आंदोलन तहसीलदार गंगापूर यांच्यासमोर खाली मुंडके वर पाय करून सरकारचा निषेध करतो व दोन दिवसांच्या आत आपण जर सकारात्मक भूमिका घेऊन बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन थांबवले नाही तर दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता ढोरेगाव येथे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर हायवे मागण्या मान्य होईपर्यंत अडवून धरून चक्काजाम करू असा इशारा आंदोलकांनी निवेदनात दिला आहे.