FDA Raid : इमरतीसाठी प्रसिद्ध गुलमंडीवरील मिठाई भांडारवर एफडीएचा छापा

इमरतीसाठी प्रसिद्ध जुन्या शहरातील गुलमंडीवरील एका मिठाई भांडारवर बुधवारी (दि.२२) सांयकाळी अन्न व औषधी प्रशासनाकडून छापा टाकण्यात आला.
FDA
FDAPudhari
Published on
Updated on

FDA raids sweet shop at Gulmandi, famous for 'Imarti'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : इमरतीसाठी प्रसिद्ध जुन्या शहरातील गुलमंडीवरील एका मिठाई भांडारवर बुधवारी (दि.२२) सांयकाळी अन्न व औषधी प्रशासनाकडून छापा टाकण्यात आला. अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी हॉ‌टेलमधील खाद्यतेल, मिठाई, फरसाणसह विविध खाद्यपदार्थांची तपासणी केली. यात काही संशियत नमुने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

FDA
Sambhajinagar News : आंदोलनात अश्लील वाक्यांचे फलक, विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

अन्न व औषधी प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यापासून अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही शहरासह जिल्ह्यात अन्न प्रशासनाकडून कारवाई केल्या जात आहे. आतापर्यंत अनेक हॉटेल्स, बिर्याणी हाऊस, ज्युस सेंटरवर कारवाई करत परवाने रद्द करण्यात आले.

बुधवारी अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी जुन्या शहरातील गुलमंडीवरील प्रसिद्ध अशा मिठाई भांडारवर अचानक छापा टाकला. तीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिठाई भांडारमधील जिलेबी, इमरती, पेढा, फरसाण यासह विविध खाद्यपदार्थ, कच्चा माल, तसेच खाद्यतेल, मिठाईत वापरले जाणारे खाद्यरंगाचे प्रमाण, त्याची एक्सपायरी डेट, लेबलिंगची तपासणी केली. मिठाईचे ट्रे, कढाई यासह इतर खाद्यपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूं, स्वच्छता, पिण्यायोग्य पाण्याचा वापर होत आहे का? याचीही पाहणी केली. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नोंदणी आहे का ? यासह विविध कागदपत्रांची पडताळणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

FDA
Kidnapping youth : वाळूच्या कमिशनवरून रिक्षा अडवून तरुणाचे अपहरण

मिठाई भांडारचाही परवाना रद्द ?

मिठाई भांडारमध्ये तपासणीत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या. काही संशयित नुमने पथकाने तपासणीसाठी जप्त केले. त्याचा रिपोर्ट येईपर्यंत मिठाई भांडार बंद ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी जाताना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news