Sambhajinagar News : दालन वाटपावरून मनपात पुन्हा राजकीय धुरळा

वंचितच्या गटनेत्याला दालन : एमआयएमची मनपात घोषणाबाजी
Sambhajinagar News : दालन वाटपावरून मनपात पुन्हा राजकीय धुरळा
Sambhajinagar News : दालन वाटपावरून मनपात पुन्हा राजकीय धुरळाfile photo
Published on: 
Updated on: 

Political turmoil erupts again in the Municipal Corporation over the allocation of stalls

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील गटनेत्यांसाठी स्वतंत्र दालन देण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असतानाच वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान यांना दालन मिळाल्याने महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. सुमारे दोन हजार चौरस फुटांच्या दालनासाठी एक कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप करीत बुधवारी (दि.३०) एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी केली. एकाला दालन, दुसऱ्याला प्रतीक्षा असा सवाल उपस्थित करीत एमआयएमने प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.

Sambhajinagar News : दालन वाटपावरून मनपात पुन्हा राजकीय धुरळा
Heritage Walk : विद्यार्थ्यांनी अनुभवला बीबी का मकबरा 'हेरिटेज वॉक'

महापालिकेतील गटनेत्यांना स्वतंत्र दालन मिळावे, यासाठी शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडून सातत्याने मागणी केली जात आहे. यासाठी महापौर समीर राजूरकर यांच्याकडेही पाठपुरावा सुरू होता. मात्र, सर्व पक्षांच्या मागणीवर एकत्रित निर्णय होण्यापूर्वीच वंचितच्या गटनेत्याला दालन देण्यात आल्याने बुधवारी एमआयएमने नाराजी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे नगरसेवक आयुक्त अमोल येडगे यांच्या दालनाकडे गेले. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखल्याने काही काळ मुख्यालयात रेटारेटीची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर आयुक्तांनी नगरसेवकांना आत घेण्याची सूचना केली. मात्र, शिष्टमंडळासोबत आलेले कार्यकर्ते आणि नगरसेवकांचे पती यांना रोखण्यात आल्याने पुन्हा गोंधळ झाला.

दरम्यान, आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेत समीर बिल्डर यांनी दालनाचे आकारमान आणि त्यासाठी झालेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच पाच नगरसेवक असलेल्या पक्षाच्या गटनेत्याला दोन हजार चौरस फुटांचे दालन देऊन त्यावर एक कोटी रुपये खर्च करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. तर एमआयएमचे ३६ नगरसेवक असतानाही त्यांच्या गटनेत्याला अद्याप दालन मिळालेले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Sambhajinagar News : दालन वाटपावरून मनपात पुन्हा राजकीय धुरळा
Sambhajinagar News : अपघातात मृत एसटी वाहकाच्या वारसांना ५७ लाखांची भरपाई

हे दालन मंत्री अतुल सावे यांच्या सांगण्यावरून देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, आयुक्तांनी पक्षांची नावे न घेता केवळ मागण्या मांडण्याची सूचना केली. यानंतर एमआयएमचे शिष्टमंडळ महापौर समीर राजूरकर यांच्या दालनात गेले. एमआयएमसोबत पक्षपातीपणाची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सर्व गटनेत्यांना दालन उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला पत्र दिले असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र, दालनाचा आकार किती असावा, याबाबत निश्चित नियमावली नसल्याचेही त्यांनी सांगितले तसेच एमआयएमच्या गटनेत्यालाह दालन दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

एका दालनावर कोटीचा खर्च कशासाठी : एका दालनावर महापालिकेत एमआयएमचे ३६ नगरसेवक आहेत. आमच्या गटनेत्याला दालन मिळालेले नाही. मात्र पाच नगरसेवक असलेल्या पक्षाला दोन हजार चौरस फुटांचे दालन देण्यात आले. त्यावर किमान एक कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. जनतेच्या कराच्या पैशांची अशी उधळपट्टी सहन केली जाणार नाही. प्रशासन मनमानी करीत असून, हे दालन मंत्री अतुल सावे यांच्या सांगण्यावरून देण्यात आले, असा माझा आरोप आहे.
- समीर बिल्डर, विरोधी पक्षनेता, एमआयएम

दालनात पत्त्यांचा डाव मांडणार का ?

गटनेत्यांना दालन न मिळाल्यावरून महापौरांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान समीर बिल्डर यांनी वंचितला देण्यात आलेल्या दालनाचा वापर पत्ते खेळण्यासाठी होणार का ? असा सवाल केला. यावेळी त्यांनी अफसर खान यांच्याकडे हातवारेही केले. बिल्डर यांच्या या टिप्पणीमुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.

संख्येवर नव्हे, गटनेत्याच्या पदावर दालन महापालिकेतील प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याला दालन दिले जाते. नगरसेवकांची संख्या हा त्याचा निकष नाही. त्यानुसार वंचितच्या गटनेत्याला दालन मिळाले आहे. दालनाच्या खर्चावर एमआयएमचा आक्षेप असेल, तर त्यांच्या गटनेत्याला दालन देऊ नये, त्यामुळे महापालिकेचा खर्च वाचेल.
- अफसर खान , गटनेता, वंचित बहुजन आघाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news