Crime News : तपासासाठी शहरात आलेल्या पोलिस पथकाला चौघांची मारहाण

घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शहरात आलेल्या फुलंब्री पोलिसांच्या तपास पथकावर चौघांनी हल्ला चढविल्याची घटना
Crime News
Crime News : तपासासाठी शहरात आलेल्या पोलिस पथकाला चौघांची मारहाणfile photo
Published on: 
Updated on: 

Police team visiting the city for an investigation assaulted by four individuals

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शहरात आलेल्या फुलंब्री पोलिसांच्या तपास पथकावर चौघांनी हल्ला चढविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मिसारवाडीतील अण्णा भाऊ साठे चौकाजवळ घडली. पोलिसांनी ओळखपत्र दाखवूनही हल्लेखोरांनी एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घातला. तसेच कारची चावीही हिसकावली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी रवी मिसाळ, यश मिसाळ आणि त्यांचे दोन साथीदारांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Bidkin Industrial Area : बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र रेल्वे जोडणीला गती द्या

कैलास प्रेमसिंग राठोड (४२) हे फुलंब्री पोलिस ठाण्यात हवालदार आहेत. पोखरी शिवारातील घरफोडी प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहकाऱ्यांसह नारेगाव आणि मिसारवाडी परिसरात आले होते. या पथकात राठोडसह नागलोद आणि सुनील सोनवणे यांचा सहभाग होता. हे पथक साध्या वेशात तपास करून खासगी कारने एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याकडे जात असताना अण्णा भाऊ साठे चौकाजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीने (एमएच-२०-जीएफ-०९७५) त्यांच्या कारला धडक दिली. यात दुचाकीवरील रवी मिसाळ आणि यश मिसाळ हे दोघे खाली पडले. पोलिसांनी त्यांना उचलून रस्त्याच्या बाजूला केले. मात्र, दोघांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

ओळखपत्र दाखवूनही मारहाण पोलिसांनी आपले ओळखपत्रही दाखविले. मात्र, त्यानंतरही मिसाळ बंधूंनी पोलिसांना मारहाण केली. त्यातील एकाने फोन करून साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच दोन तरुण तेथे आले. त्यांनीही जीवे मारून टाकू अशी धमकी देत एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घातला. व इतरांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

Crime News
Fraud Case : मदतीच्या बहाण्याचे वृद्धाचे ७४ हजार रुपये लाटले

कारची चावी हिसकावली

पोलिसांना मारहाण करत असतानाच एका तरुणाने सोनवणे यांच्याकडील कारची चावी हिसकावली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी धाव घेत पोलिसांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. भर रस्त्याच्या झालेल्या या मारहाणीमुळे नागरिकही आवाक झाले होते. गंभीर जखमी सोनवणे यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआयडीसी सिडको पोलिस गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.