Bidkin Industrial Area : बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र रेल्वे जोडणीला गती द्या

सीएमआयएची दक्षिण मध्य रेल्वेकडे मागणी; टोयोटा, जेएसडब्ल्यू, अथर एनर्जीसह प्रमुख उद्योगांचा सहभाग
Bidkin Industrial Area
Bidkin Industrial Area : बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र रेल्वे जोडणीला गती द्याfile photo
Published on: 
Updated on: 

Accelerate the independent rail connection for the Bidkin Industrial Area

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात वेगाने विस्तारत असलेल्या औद्योगिक क्षेत्रांची भविष्यातील मालवाहतूक लक्षात घेऊन करमाड ते बिडकीन स्वतंत्र रेल्वे जोडणी विकसित करावी. तसेच शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज औद्योगिक क्षेत्रांना राष्ट्रीय रेल्वे जाळे, प्रमुख बंदरे आणि ड्रायपोर्टशी जोडण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करावा, अशी मागणी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) वतीने दक्षिण मध्य रेल्वेकडे करण्यात आली.

सीएमआयएच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. १३) दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक झाली. यामध्ये औद्योगिक उत्पादनक्षमता, आगामी गुंतवणूक, कच्च्या मालाची आवक, तयार उत्पादनांची वाहतूक आणि निर्यातीसाठी रेल्वेच्या संभाव्य वापराबाबत चर्चा करण्यात आली. सीएमआयएचे अध्यक्ष अथर्वेशराज नांदावत यांच्यासह जेएसडब्ल्यू मोटर्स, अथर एनर्जी, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज,

अभिषेक ग्रुप आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी एस. सूर्यवंशी, के. प्रशांत स्वामी आणि वाहतूक निरीक्षक सुलतान रमजानी उपस्थित होते. वर्षाला २५.७० लाख टन मालवाहतुकीचा अंदाज 'इंडस्ट्रियल फ्रेट पोटेन्शियल असेसमेंट' या विषयावरील सादरीकरणात ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, पोलाद, औषधनिर्माण, कृषी व अन्नप्रक्रिया,

अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांच्या वाहतूक गरजांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार दरवर्षी सुमारे १५.२० लाख मेट्रिक टन कच्च्या मालाची आवक, तर १०.५० लाख मेट्रिक टन तयार मालाची वाहतूक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

वाहन उद्योगांमुळे मागणी वाढणार

बिडकीनमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर, जेएसडब्ल्यू मोटर्स आणि अथर एनर्जीच्या प्रकल्पांमुळे आगामी काळात मालवाहतुकीत मोठी वाढ अपेक्षित आहे. वाहननिर्मितीसाठी लागणारे पोलाद, अॅल्युमिनियम, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सुटे भाग बाहेरून आणावे लागणार आहेत. तसेच तयार वाहने देशांतर्गत बाजारपेठांसह निर्यातीसाठी बंदरांपर्यंत पोहोचविण्यास रेल्वेची सक्षम व्यवस्था आवश्यक असल्याचे उद्योग प्रतिनिधींनी स्पष्ट केले. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक विस्ताराचा विचार करून रेल्वे जोडणी आणि मालवाहतूक सुविधांचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.