Sambhajinagar News : दहा महिन्यांपासून श्रीरामनगरातील पोलिस चौकी धूळखात

परिसरात गुंडगिरी वाढली : नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर
Sambhajinagar News
Sambhajinagar News : दहा महिन्यांपासून श्रीरामनगरातील पोलिस चौकी धूळखातfile photo
Published on: 
Updated on: 

Police post in Sriramnagar has been unused for ten months

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-२ विठ्ठलनगर, श्रीरामनगर, प्रकाशनगर, संघर्षनगर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला, अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केले होते. या उपोषणादरम्यान मुकुंदवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत विठ्ठल चौक येथे पोलिस चौकी उभारण्याची मागणीही लावून धरण्यात आली होती. स्थानिक नागरिकांच्या 'आर्थिक' सहभागातून पोलिस चौकी उभी राहिलीही मात्र गेल्या दहा महिन्यांपासून ही पोलिस चौकी धूळखात पडून आहे.

Sambhajinagar News
Crime News : बंटी दीक्षितच्या हत्येमागे बिअर-बार प्रोटेक्शनचा वाद

संघर्षनगर येथे रविवारी किरकोळ वादातून तरुणाचा खून झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस चौकी बंद असल्याचा परिणाम परिसरातील सुरक्षिततेवर होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत असून खून, लूटमार, छेडछाड, चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरात गुंडगिरी वाढत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असताना पोलिस चौकी बंद राहण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. खा. डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते विठ्ठल चौक येथील पोलिस चौकीचे अनावरण करण्यात आले होते. यावेळी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पीआय सचिन इंगोले, सहायक पोलिस उपायुक्त, उस्मानपुरा यांनी भेट देऊन एक पोलिस अधिकार आणि ५ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, तुम्ही उपोषण मागे घ्या, असे सांगितले होते.

नगरसेवकांची उदासीनता

मुकुंदवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत विठ्ठलनगर-रामनगर येथे पोलिस चौकीमध्ये पोलिस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, यासाठी पोलिस आयुक्तांकडे एकाही नगरसेवकाने कुठल्याही प्रकारचा ठोस पाठपुरावा केला नाही. नगरसेविका वैशाली कोरडे यांनी मात्र या पोलिस चौकीसाठी ५ हजार रुपयांची मदत केली होती.

Sambhajinagar News
Sambhajinagar Crime News : मिटमिटा भागात घर फोडून २.८० लाखांची रोकड अन् ३ तोळे सोने लंपास
तर मोठे आंदोलन उभारणार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी परिसरात पोलिस चौकी उभारण्याची मागणी सर्वप्रथम आम्हीच केली होती. मी ३ दिवस विठ्ठल चौकात उपोषणही केले होते. स्थानिक नागरिकांच्या आर्थिक सहकार्यातून आम्ही पोलिस चौकी बांधली. मात्र वेळोवेळी पोलिस आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही या पोलिस चौकीसाठी एकही कर्मचारी उपलब्ध झाला नाही.
- सुभाष पाटील पांडभरे, सामाजिक कार्यकर्ते
मनुष्यबळ कमी असल्यामुळे कर्मचारी देणे अशक्य मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात ११७कर्मचारी मंजूर असताना केवळ ७४ कर्मचारीच उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे श्रीरामनगर येथील विठ्ठल चौकात पोलिस चौकीसाठी कर्मचारी देणे सध्या तरी शक्य नाही.
- विवेक सोनवणे, मुकुंदवाडी पोलिस ठाणे
लोकांनी उभारलेल्या जन आंदोलनातून, आर्थिक सहभागातून परिसरात चौकी उभारल्या गेली. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून या चौकीसाठी एकही कर्मचारी उपलब्ध झाला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी येथील पोलिस चौकी सुरू होणे नितांत गरजेचे आहे.
कॉ. भास्कर लहाने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news