Crime News : बंटी दीक्षितच्या हत्येमागे बिअर-बार प्रोटेक्शनचा वाद

महिनाभरापासून रचला होता हत्येचा कट; लोकांच्या डोळ्यादेखत दांड्याने क्रूरपणे डोके ठेचले
Crime News
Crime News : बंटी दीक्षितच्या हत्येमागे बिअर-बार प्रोटेक्शनचा वादfile photo
Published on: 
Updated on: 

Dispute over 'protection' for beer bars behind Bunty Dixit's murder

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको एन-७ चौकात गुरुवारी सकाळी बंटी ऊर्फ देवेश दीक्षित याच्यावर कार चढवून व डोके ठेचून करण्यात आलेल्या निघृण हत्याकांडाची पाळेमुळे सिडको परिसरातील बिअर बारचे 'प्रोटेक्शन' रॅकेट आणि वर्चस्वामध्ये रुतल्याचे समोर येत आहे. आरोपी पवन पराशर याने भररस्त्यात, नागरिकांच्या डोळ्यांसमोर ज्या क्रूरपणे हे हत्याकांड घडवून आणले, ते पाहून अनेकांच्या अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Crime News
Sambhajinagar News : चिकलठाण्यात ड्रेनेजच्या पाण्यावर पालेभाज्यांची शेती

बिअर बारला 'प्रोटेक्शन' अन् भाईगिरी सूत्रांच्या माहितीनुसार, मयत बंटी दीक्षित याचे सिडको एन-७ परिसरात मोठे सामाजिक व राजकीय निर्माण होत होते. दोनच दिवसांपूर्वी त्याने रामलीला मैदानावर भव्य रावण दहन सोहळा घेतला होता, ज्याला मंत्री आणि दिग्गज नेते हजर होते. त्याच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी होती. दुसरीकडे, आरोपी पवन पराशर याचे अवघ्या १० महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून त्याच्या कुटुंबात चुलत भाऊ, चुलते पत्नी असा परिवार आहे. पवन हा सिडको भागातील प्रमुख ४ ते ५ बिअर बार चालकांना 'प्रोटेक्शन' देण्याचे, तिथे होणारे वाद-तंटे हाताळण्याचे काम करत होता.

या कामाच्या जोरावर तो या भागात स्वतःची दहशत निर्माण करू पाहत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन हा शहरातील एका 'भाई'च्याही सातत्याने संपर्कात होता. बंटी माझ्या बारच्या कामात सतत आडकाठी आणत होता, इतरांसमोर माझा अपमान करायचा आणि दिसल्यास खुन्नस द्यायचा; माझ्या धंद्यात त्याचे मोठे नुकसान केले, असा दावा पवनने पोलिसांसमोर केला असला, तरी या हत्येमागे बारच्या हप्त्यांवरून उफाळलेला वर्चस्वाचा वादच मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. नवरात्रातील एका दांडियाच्या आयोजनावरूनही त्यांच्यात ठिणगी पडली होती.

हत्येच्या दिवशीच कोर्टात होती साक्ष

काही महिन्यांपूर्वी बंटी दीक्षित याच्यावर काही गुंडांनी जीवघेणा हल्ला चढवला होता. व्या गंभीर गुन्हयामध्ये गुरुवारीच व्यायालयात बंटीची महत्त्वाची साक्ष नोंदवली जाणार होती. योगायोगाने त्याच दिवशी सकाळी कोर्टात जाण्यापूर्वीच त्याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. त्या जुन्या गुन्ह्यातील आरोपी वेगळे असले तरी त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Crime News
Sambhajinagar News : पशुधनासाठी जिल्हाभरात गावोगावी पाणवठे उभारा

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त सुरूवार नवले सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सिडकोचे निरीक्षक अतुल येरमे, जिन्सीचे निरीक्षक गणेश ताठे, मुकुंदवाडीचे निरीक्षक विवेक सोनवणे, छावणीचे प्रभारी गायकवाड आणि उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी रक्ताने माखलेला दांडा, कार आणि फरफटत गेलेल्या वाहनाचे नमुने गोळा केले.

हत्येचा कट रचला थंड डोक्याने

पवनने हे हत्याकांड रागाच्या भरात केलेले नसून अत्यंत थंड डोक्याने नियोजन केल्याचे उघड झाले आहे. पवनने तब्बल महिनाभरापूर्वीच आपल्या पत्नीला माहेरी पाठवून दिले होते. तेव्हापासून तो बंटीवर पाळत ठेवून होता. गुरुवारी सकाळी बंटीने आझाद चौकातील जिममध्ये व्यायाम करताना काढलेला फोटो सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवला. दबा धरून बसलेल्या पवनने ते स्टेटस पाहताच कार सज्ज केली आणि बंटी जिमबाहेर पडताच त्याचा शेवटपर्यंत पाठलाग केला.

मोबाईल जप्त; 'सीडीआर' आणि व्हॉट्सअॅप चॅट तपासणार हत्येनंतर स्वतः सिडको पोलिस ठाण्यात हजर झालेल्या पवन पराशरचा मोबाईल पोलिसांनी तात्काळ जप्त केला आहे. पवनने हत्येच्या आधी कोणाशी संपर्क साधला होता? घटनेनंतर त्याने कोणाला फोन केला? या हत्येसाठी कोणाकडून आर्थिक मदत झाली होती का? हे शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप चॅटिंगचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले आहे. पवनने स्वतःचे सोशल मीडिया अकाऊंड डिलिट केले आहे.

फरफटत गेलेली मोपेड

कारने पाठीमागून भीषण धडक दिल्यानंतर बंटी अगोदर कारच्या काचेवर व नंतर तिथेच रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, तर त्याची मोपेड तब्बल १५० फूट अंतरावरील विश्वास वाईन शॉपपर्यंत आरोपीने फरफटत नेल्याने तिचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

यू-टर्न घेऊन अमानुष वार

चौकातून सुसाट कार वळवून परत येत पवनने गॅस एजन्सीच्या भिंतीला कार धडकवली आणि खाली उतरून बंटी मृत झाला की नाही याची खात्री केली आणि डोक्यावर व चेहऱ्यावर एकापाठोपाठ एक दांड्याचे जोरदार घाव घालून डोके ठेचून काढले. या घटनेचा एका नागरिकाने मोबाईलमध्ये व्हिडीओ कैद केला.

हातात दांडा घेऊन पळाला

रक्तबंबाळ मृतदेह पाहून आजूबाजूचे नागरिक ओरडत पुढे येताच, पवन हातात दांडा हवेत नाचवत कारच्या दिशेने धावला, दांडा मागील सीटवर टाकला आणि कार चालवत स्वतः जवळच असलेल्या सिडको पोलिस ठाण्यात हजर झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news