Imtiaz Jaleel : ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नोटीस देण्यासाठी जलील यांच्या घरी धडकले पोलिस

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना माजी खा. इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel : ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नोटीस देण्यासाठी जलील यांच्या घरी धडकले पोलिसFile Photo
Published on
Updated on

Police Jalil's house notice in atrocity case

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना माजी खा. इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला होता.

Imtiaz Jaleel News
Sambhajinagar Encroachment Campaign : पडेगाव-शरणापूर रस्त्यावर ८५७ बांधकामे भुईसपाट

जलील यांच्या अटकेची मागणी करत शहरात भव्य मोर्चाही निघाला होता. दरम्यान, शुक्रवारी (दि.४) अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नोटीस बजावण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी गेले होते, मात्र जलील यांनी नोटीस न घेतल्याने पोलिस माघारी फिरले.

अधिक माहितीनुसार, माजी खा. इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यात चौकशीसाठी शनिवारी (दि.५) हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यासाठी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, सिटी चौक ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जलील यांच्या घरी गेले होते.

Imtiaz Jaleel News
Sambhajinagar Encroachment Campaign : शहरात सध्या फक्त पाडापाडी, सर्व्हिस रोड करणार नाही, मनपा प्रशासकांची स्पष्ट भूमिका

तिथे त्यांनी जलील यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा केली. अॅट्रॉसिटीचे प्रकरण नेमके काय हे पोलिसांनी जलील यांना सांगितले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी शनिवारी हजर राहण्यासाठी लेखी नोटीस देत असताना जलील यांनी नोटीस घेतली नाही, अशी माहिती एसीपी संपत शिंदे यांनी दिली. चौकशीला हजर राहण्याची नोटीस घेतली नसल्याने आता वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कारवाईबाबत ठरवू, असेही एसीपी शिंदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news