kidnapping Case : निवृत्त वन अधिकाऱ्याचे फिल्मी स्टाईल अपहरण ; डोळ्यावर पट्टी बांधून लुटले

वन संरक्षकाचे त्यांच्याच शेतासमोरून चार अज्ञातांनी भरदिवसा अपहरण करून त्यांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sambhajinagar kidnapping case |
kidnapping Case : निवृत्त वन अधिकाऱ्याचे फिल्मी स्टाईल अपहरण ; डोळ्यावर पट्टी बांधून लुटलेFile Photo
Published on
Updated on

Film style kidnapping of retired forest officer; Robbed while blindfolded

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील गारखेडा परिसरात राहणाऱ्या एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त सहाय्यक वन संरक्षकाचे त्यांच्याच शेतासमोरून चार अज्ञातांनी भरदिवसा अपहरण करून त्यांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार रविवारी (दि. १५) दुपारी १२ ते सायंकाळी ७ या वेळेत गांधेली गाव, चिकलठाणा भागात घडला.

Sambhajinagar kidnapping case |
बंबाटनगरात नशेखोरांचा पैशासाठी मजुरांवर हल्ला

आरोपींनी जमिनीवरील दावा सोडण्याची धमकी देत त्यांना बदनापूर भागात सोडून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी एकनाथ लक्ष्मणराव कान्हेरे (६८) हे रविवारी सकाळी चिकलठाणा येथील त्यांच्या गट क्र. ६३१ मधील शेतात गेले होते. सकाळी ११:३० च्या सुमारास काम आटोपून ते आपल्या कारने घरी जाण्यासाठी निघाले. शेताचे गेट बंद करत असतानाच चिकलठाणा येथील त्यांच्या गट क्र. ६३१ मधील शेतात गेले होते.

Sambhajinagar kidnapping case |
पीडब्ल्यूडीचा क्यूआर घोटाळा २ हजार कोटींचा

चार तरुण त्यांच्या दिशेने धावत आले. काहींनी त्यांना उचलून त्यांच्याच गाडीत टाकले आणि डोळ्यावर पट्टी बांधून त्यांचे हात-पाय दोरीने बांधले. अपहरणकर्त्यांनी कान्हेरे यांना गाडीत आडवे पाडून मारहाण केली आणि तू खूप पैसे कमावले आहेस, ५ लाख रुपये दे, अशी मागणी केली. आरोपींनी त्यांच्या हातातील १० ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि खिशातील ८०० रुपये रोख असा ऐवज बळजबरीने काढून घेतला.

जालना जिल्ह्यात नेऊन सोडले अपहरणकर्त्यांनी कान्हेरे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीला आणि मुलाला फोन करायला लावून मी दर्शनासाठी आलो असून, संध्याकाळी उशिरा घरी येईन, असे खोटे सांगण्यास भाग पाडले. दिवसभर फिरवल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपींनी त्यांना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील किनगाव चौफुली येथे सोडून पळ काढला.

जमीन वादातून संशयाची सुई

कान्हेरे यांच्या पत्नीला त्यांच्या वडिलांकडून जमीन मिळाली आहे. काही जमीन कान्हेरे यांच्या वडिलांच्या नावे असलेली वारसा हक्काने मिळाली आहे. मात्र त्यावरून त्यांचे काही नातेवाइकांसोबत वाद झाले. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या घटनेमागे जमिनीचा जुना वाद असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. कान्हेरे यांनी त्यांचा एक भाऊ, साला, तहसील एजंट आणि अन्य एकाने अपहरण घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news