अजिंठा लेणीवर ड्रोनच्या घिरट्या; पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

अजिंठा लेणीवर ड्रोनच्या घिरट्या; पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर
Chhatrapati Sambhajinagar news
अजिंठा लेणीवर ड्रोनच्या घिरट्या; पोलिस प्रशासन अलर्ट मोडवरPudhari photo
Published on
Updated on

सागर भुजबळ

फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या जतन,संवर्धन व संरक्षणासाठी लेणीच्या तीनशे मीटर अंतराच्या आत केंद्र व राज्य शासनाने ड्रोन उडविण्यास निर्बंध घातलेले आहेत. असे असताना शुक्रवारी (दि. २७) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास अजिंठा लेणी ड्रोनच्या घिरट्यांनी येथील सुरक्षारक्षक व रात्रपाळीवर असलेल्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच भारतीय पुरा- तत्त्व विभागाचे संवर्धन सहायक अधिकारी मनोज पवार, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक राज पाटील, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत येथील सुरक्षाकर्मी व रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांना धीर देत अजिंठा लेणीचा संपूर्ण परिसर पिंजून काढला व येथील सुरक्षास्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र लेणीच्या निर्बंधीत क्षेत्रात अज्ञात ड्रोन कॅमेऱ्याच्या बिनधास्त मुशाफिरीमुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे दिसून आले.

युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळाचा बहुमान मिळविणाऱ्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या जतन, संवर्धन व सुरक्षेसाठी केंद्र शासनच्या अखत्यारित येणाऱ्या भारतीय पुरातत्त्व विभागाने अनेक निर्बंध घातलेले आहेत. त्यानुसार अजिंठा लेणीतील तीनशे मीटर परिघातील निर्बंधीत क्षेत्रात दिवसा किंवा रात्री ड्रोन कॅमेरे उडविण्यास बंदी आहे.

अजिंठा लेणीतील निर्बंधीत क्षेत्राबाहेरील परिसरात ड्रोन कॅमेरे उडविण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर सदरील माहिती अजिंठा लेणीतील स्थानीय कार्यालयात कळवावी लागते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने सहसा कोणीही अजिंठा लेणीत ड्रोन उडविण्याची परवानगी मागत नाही. परंतु शुक्रवारी रात्री तीन ड्रोन कॅमेऱ्यांनी अजिंठा लेणीतील निबंधीत क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून तब्बल पाच तास तीन घिरट्या घातल्या. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे भारतीय पुरातत्त्व विभाग, पर्यटन महामंडळ व पोलिस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

आता अँटी ड्रोन गनचा वापर करणार ड्रोनबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. ड्रोनमुळे अजूनपर्यंत कोठेही अनुचित घटना घडलेली नसल्याने नागरिकांनी घाबरू नये. सुर- क्षेच्या दृष्टीने अजिंठा लेणीत गस्त वाढविण्याचा व अँटी ड्रोन गनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रफुल्ल साबळे, स. पोलिस निरीक्षक, फर्दापूर

तीन ड्रोन आढळले अजिंठा लेणी परिसराची ३७ सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक, कर्मचारी व पोलिसांच्या माध्यमातून २४ तास निगरानी केली जाते. असे असतानाही तीन ड्रोन कॅमेरे लेणीतील निर्बंधीत क्षेत्रात दाखल झाले, ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. मी पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक राज पाटील व स.पो.नि. प्रफुल्ल साबळे यांच्यासह अजिंठा लेणीत धाव घेतली. यावेळी तीन ड्रोन कॅमेरे लेणी, सप्तकुंड धबधबा व व्हयू पॉइंट परिसरात घिरट्या घालताना दिसून आले. आम्ही रात्री एक वाजेपर्यंत संपूर्ण लेणी परिसर पिंजून काढला. सुरक्षेच्या दृष्टीने लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात ही सुरक्षाकर्मी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोज पवार, संवर्धन सहायक अधिकारी, भारतीय पुरातत्त्व विभाग

Chhatrapati Sambhajinagar news
Pimpri News : अवैध ड्रोनच्या घिरट्या; पोलिस आयुक्तालय स्थापनेपासून एकही गुन्हा नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news