Police Action on School Vehicle : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; 121 स्कूलबसवर पोलिसांची कारवाई

नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस आयुक्तांकडे प्राप्त
छत्रपती संभाजीनगर
रिक्षात विद्यार्थ्यांना समोर बसवून नेणाऱ्या चालकाला दंड करताना पोलिस.Pudhari News Network
Published on
Updated on
Summary
  • शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा

  • दिवसभरात २३३ वाहने तपासून १२१ वाहनचालकांना १ लाख १० हजार ६०० रुपयांचा दंड

  • नियमांचे उल्लंघन : विद्यार्थी व पालकांना बेशिस्त स्कूलबस चालकांमुळे नाहक त्रास

छत्रपती संभाजीनगर : शहरात शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आणि क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेऊन धावणाऱ्या स्कूलबस, रिक्षा, व्हॅनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बैठक घेऊन कारवाईच्या सूचना देताच दुसऱ्याच दिवशी वाहतूक पोलिस कामाला लागले आहे. मंगळवारी (दि.२९) दिवसभरात २३३ वाहने तपासून १२१ वाहनचालकांना १ लाख १० हजार ६०० रुपयांचा दंड लावण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर
गणवेश परिधान न करणाऱ्या स्कूलव्हॅन चालकाला दंड करताना पोलिस.Pudhari News Network

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूलबस,रिक्षा, व्हॅन व इतर वाहन चालक हे विनागणवेश, विनापरवाना, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविणे असे नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. विद्यार्थी व पालकांना बेशिस्त स्कूलबस चालकांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सोमवारी (दि. २८) सर्व वाहतूक शाखेचे प्रभारी, आरटीओचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त धनंजय पाटील, वाळूज शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, शहर वाहतूक शाखा दोनचे अमोल देवकर, छावणी विभागाचे एपीआय सचिन मिरधे, सिडको शाखेचे हरे-श्वर घुगे, सर्व वाहतूक शाखेचे अंमलदार यांनी मंगळवारी संयुक्त तपासणी मोहीम राबविली. विविध शाळा तसेच चौकांमध्ये स्कूलबसची तपासणी करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर
Pudhari Special Ground Report | नियम धाब्यावर.. विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर!
छत्रपती संभाजीनगर
स्कूलबसची तपासणी करून कारवाई करताना वाहतूक पोलिस दिसत आहेत.Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर
School Journey : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारा टेम्पोवाला अडचणीत

कारवाई थांबणार नाही...शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस, रिक्षा, व्हॅन चालक, मालकांनी नियमांचे पालन करावे. क्षमेतपेक्षा अधिक विद्यार्थी वाहनात बसवू नयेत. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. शहरात विविध ठिकाणी अशीच विशेष मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूलबसवर कारवाई करण्यात येणार आहे.

धनंजय पाटील, एसीपी, वाहतूक शाखा

या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन

क्षमतेपेक्षा अधिक विद्याथी बसविणे, वाहन चालक परवाना नाही, गणवेश परिधान केलेला नाही, तुटलेली नंबर प्लेट, सीट बेल्ट न लावणे, वाहनाचे फिटनेस सर्टीफिकेट नसणे यासह अन्य नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार समोर आले आहेत. यात सीट बेल्ट नसल्याने ६ ते ७ हजार, गणवेश नसल्याने २ ते सहा हजार असे दंड लावण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news