

Pictures of birds with flowers, intoxication from LSD papers the size of a fingernail
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातून नशेखोरी हद्दपार करण्यासाठी: पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पदभार घेताच सुरू केलेल्या मोहिमेत आरोपी खादरी मारुफ बटन, गांजा, एमडी ड्रग्स, चरस, सिरप विकणाऱ्या अनेक टोळ्यांचा बिमोड करून गजाआड केल्या. आता घातक नशेचा पदार्थ एलएसडी पेपरची तस्करी करणाऱ्या पेडलरला एनडीपीएस पथकाने बेड्या : ठोकल्या. फुल, पशुपक्ष्यांची चित्रे: असलेल्या नखाएवढ्या आकाराचे नशेचे पेपर विक्री करणाऱ्या सिव्हिल इंजिनीअरला शुक्रवारी (दि.३) बीबी का मकबरा परिसरात अटक करण्यात आली.
खादरी मारुफ अहमद शाहिद अहमद (२६, रा. आरेफ कॉलनी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ०.०९ ग्रॅम पेपर जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली.
तरुणाई नशेच्या खाईत लोटणाऱ्या तस्करांचा बिमोड करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्थापन केलेल्या अँटी नार्कोटिक्स पथकाला बीबी का मकबराजवळ एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने सापळा रचून खादरी या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये नखा एवढ्या आकाराचे विविध पक्षी, फुलांची चित्रे असलेले कागदाचे १० चौकोनी तुकडे आढळून आले. चौकशीत नशेसाठी वापरण्यात येणारे एलएसडी पेपर असल्याचे सांगितले. त्याचे वजन ०.०९ ग्रॅम एवढे भरले. जप्त करून त्याला अटक केली.
बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले, प्रभारी सहायक पोलिस आयुक्त संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गीता बागवडे, पीएसआय अमोल म्हस्के, लालखान पठाण, संदीपान धर्मे, नितेश सुंदर्डे, महेश उगले, विजय त्रिभुवन, सतीश जाधव, छाया लांडगे यांनी केली.
लिसर्जिक अॅसिड डायथिलेमाईड म्हणजेच एलएसडी हा अतिशय घातक ड्रग्सचा प्रकार आहे. एलएसडीला छोटे-छोटे ब्लॉटर पेपरमध्ये शोषून ठेवले जाते. हे पेपर साधारणपणे जिभेखाली ठेवले १ जातात. काही वेळानंतर ड्रग रक्तात शोषले जाते आणि नशा सुरू होतो. पार्थ्यांमध्ये याचा वापर होतो. सेवनाने मेंदू, स्नायूंवर प्रभाव होतो. ०.००२ ग्रॅम एवढी नशा केली तरी दोन दिवस त्याच धुंदीत राहतो. वेळ व वास्तवाची जाणीव बदलते. जास्त हसणे किंवा अचानक भीती, नैराश्य येते. दृष्टी, आवाज, रंग, चव याविषयी भ्रम निर्माण होतो.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी खादरीने काही पेडलर्समार्फत कॉलेजच्या मुलांना टार्गेट करून ग्राहक बनविल्याचे अंदाज २ आहे. ही नशा महागडी असून, एक नखाएवढा तुकडा ०.००२ ग्रॅम पेपर तब्बल ३ हजार रुपयांत खादरी विक्री करत होता. त्याने काही हायप्रोफाईल पाट्यांमध्ये सप्लाय केल्याचा पोलिसांना संशय आहे. तस्करांची चेन उघड करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक गीता बागवडे करत आहेत.
आरोपी खादरी मारुफ हा सिव्हिल इंजिनीयर आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर 3 नातेवाइकांनी त्याला शिकविले. तो दुबईत नोकरी करून पुण्यात आला होता. तिथे पेडलर्सच्या संपर्कात आल्यानंतर नशेच्या एलएसडी पेपरची विक्री सुरू केली. काही महिन्यांपूर्वी शहरात येऊन इथेही त्याने जाळे विणले होते, असे सूत्रांनी सांगितले.