आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम वर्षातून दोनदा द्या

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
sambhajinagar news
आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम वर्षातून दोनदा द्याfile photo
Published on
Updated on

Pay RTE refund amount twice a year

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आरटीई प्रवेशाबाबत नवीन नियमावली बनविण्यात यावी, आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम वर्षातून दोनदा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्यावतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

sambhajinagar news
महापालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना निवेदन दिले. यावेळी आरटीई कक्ष अधिकारी संगीता सावळे उपस्थित होत्या. निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने आरटीईसंदर्भात निकाल दिला असून या निर्णयानुसार राज्य शासनास विविध गोष्टी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, फक्त अॅडमिशन घेणे आणि वर्षानुवर्षे तुटपुंजी रक्कम फी म्हणून ठरवून ती न देणे असे काम आता करता येणार नाही.

आरटीई प्रतिपूर्ती प्रति विद्यार्थी खर्च काढून त्वरित देणे आवश्यक आहे. वरील विषयास नुसार कारवाई न केल्यास आम्हाला आपल्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दाद मागावी लागेल. आरटीई रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्याही इंग्रजी शाळेवर अधिकाऱ्यांनी दबाव आणल्यास त्याच्याविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.

sambhajinagar news
Haribhau Bagade : राजकारणातील शालीनतेचा आदर्श गमावला

कोणत्याही शाळेच्या परवानगीशिवाय त्या शाळेस आरटीई पोर्टलवर रजिस्टर केल्यास त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल. कायद्यानुसार आरटीई प्रतिपूर्ती रक्कम वर्षातून दोनदा देणे बंधनकारक आहे. आता कोर्टाच्या ऑर्डरनुसार विलंब करता येणार नाही. गेल्या ८ हजार ६७० रुपये प्रति विद्यार्थी इतकी दिली जाते. ती वाढवून ३५ हजार रुपये प्रति विद्यार्थी करावी. वर्षापासून आरटीई प्रतिपूर्ती रक्कम १७ या शिष्टमंडळात राज्य अध्यक्ष प्रा. प्रवीण आव्हाळे, राज्य सरचिटणीस संदीप लघामे पाटील, अॅड ऋषिकेश जोशी, शुभांगी देशपांडे, प्रियंका राणा आदींचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news