

Path cleared for 'B' category pilgrimage site status for the Khandoba temple in Satara
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सातारा गावातील श्रीक्षेत्र खंडोबा मंदिराला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या बुधवारी (दि. ४) झालेल्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ब दर्जा मिळाल्यास मंदिर परिसराचा नियोजनबद्ध धार्मिक व पर्यटन विकास करण्यासह भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग सुकर होणार आहे. या मंदिराला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असून वर्षाकाठी १२ ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येतात, पुढील महिन्यात भरणाऱ्या चंपाषष्ठी यात्रेत भाविकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी प्रशासनाला दिले.
श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर हे खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांपैकी आठवे स्थान मानले जाते. हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील या प्राचीन मंदिराच्या गर्भगृहात आकर्षक कोरीव काम आहे. घोड्यावर स्वार असलेली खंडोबाची मोठी स्वयंभू मूर्ती आणि हातातील प्राचीन खंडा (तलवार) हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर जेजुरीच्या खंडोबाचे प्रतिरूप मानले जाते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १७६६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
तसेच या मंदिराला ब दर्जा २८ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर शासनाच्या १३ जून २०२४ च्या पत्रानुसार आवश्यक निकष आणि ना हरकत प्रमाणपत्रांसह सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने विविध विभागांकडून अभिप्राय व ना हरकत प्रमाणपत्रे मिळवून प्रस्ताव तयार केला. या मंदिराला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असून चंपाषष्ठीला येथे मोठी यात्रा भरते.
भंडारा आणि पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. नवदांपत्यांकडून जागरण गोंधळ घातला जातो. दर रविवारीही भाविकांची गर्दी असते. मंदिर परिसरातील डोंगर, निसर्गरम्य वातावरण, प्राचीन अवशेष आणि नक्षीकामामुळे हे ठिकाण विभागाने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रानुसार मंदिरात वर्षभरात १२ ते १५ लाख भाविक येत असून, त्यांच्यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो.
वन विभागाच्या अभिलेखानुसार मंदिर परिसरात राखीव, संरक्षित किंवा अवर्गीकृत वनक्षेत्र नाही. नगररचना विभागाने मंदिराचा समावेश सातारा येथील उर्वरित गावठाण क्षेत्रात असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. जलनिःस्सारण वाहिनीचे काम सुरू असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा पाइपलाइनचे कामही प्रगतिपथावर आहे.
मंदिर परिसरात पोहोच रस्ता, पार्किंग, शौचालये, पथदिवे आणि स्वच्छतेची व्यवस्था असल्याचा अहवाल प्रशासनाने सादर केला आहे. मंदिर परिसराची दररोज स्वच्छता केली जाते. मंदिराला मालमत्ता पत्रक उपलब्ध नसून, धार्मिक स्थळ असल्याने मालमत्ता कराची आकारणीही करण्यात आलेली नाही. मंदिराचे सचिव साहेबराव पळसकर यांच्याकडून आवश्यक माहिती घेऊन परिशिष्टही प्रस्तावासोबत जोडण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्वसाधारण सभेने प्रस्तावाला मंजुरी दिली. आता जिल्हा नियोजन समितीसमोर प्रस्ताव सादर करून शासनाकडून ब दर्जा मिळविण्याची पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
चंपाषष्ठीला भरते मोठी यात्रा
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीची मोठी यात्रा भरते. यावेळी भंडारा, पालखी सोहळा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. नवदांप-त्यांकडून जागरण गोंधळ घातला जातो. दर रविवारीही भाविकांची गर्दी असते. या मंदिराला ब दर्जामुळे यात्रेच्या नियोजनासह धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.