Vande Bharat toilet leakage : सुविधा देणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये असुविधा; टॉयलेटचे पाणी थेट आसनापर्यंत : प्रवाशाची तक्रार

कोचमधील स्वच्छतागृहाची निगा योग्यरीतीने राखली जात नसल्याने त्याची दुर्गंधी कोचमध्ये पसरत आहे.
Vande Bharat toilet leakage
वंदे भारत एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहातील घाण पाणी प्रवाशांपर्यंत येऊन कोचमध्ये दुर्गंधी पसरली आहे.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वेगाबरोबरच सर्व काही अॅटोमॅटिक तसेच दर्जेदार सुविधा देणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. बाहेरून अत्यंत देखण्या असलेल्या या रेल्वेतील स्वच्छतागृहातील घाण पाणी चक्क प्रवाशांच्या आसनापर्यंत पोहचत आहे. त्यामुळे कोचमध्ये दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार मोहम्मद बाईयाश यांनी शनिवारी (दि. ३०) रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. ही घटना मुंबईहून नांदेडकडे दुपारी निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या सी-८ कोचमध्ये घडली.

वंदे भारत एक्स्प्रेसची सिस्टम अॅटोमॅटिक आहे. दरवाज्यासह कोचमधील दरवाजेही सेंसर पद्धतीनेच काम करतात. आजच्या घडील केवळ बाहेरील दरवाजे अॅटोमॅटिक राहिले आहेत कोचमधील स्वच्छतागृहाची निगा योग्यरीतीने राखली जात नसल्याने त्याची दुर्गंधी कोचमध्ये पसरत आहे.

Vande Bharat toilet leakage
US Iran Isreal Conflict: जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर

एवढेच नाही तर त्यातील घाण पाणी बाहेर येऊन प्रवाशांच्या आसनापर्यंत येत आहे. विशेष म्हणजे येथील स्वच्छतागृहात पाणी घेण्यासाठी चक्क स्टीलचे भांडे ठेवण्यात आल्याने बाहेरून अॅटोमॅटिक असणारी एक्स्प्रेस मात्र आतून साधारण रेल्वेच्या वळणावर आल्याचे बाईयाश यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे.

तक्रार येताच त्याची दखल घेतली जाईल असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते. दर्जेदार सुविधेसाठी प्रवासी हजारो रुपये खर्चुन वंदे भारतने प्रवास करत आहेत. यात प्रवाशांना अशा असुविधांचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान वंदे भारतच्या स्टाफनीं तक्रार केल्यानंतरही या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली नसल्याने बराच वेळ हा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.

Vande Bharat toilet leakage
Israel-Iran Conflict | पुढील १२ तास रेल्वेचा वापर टाळा : इराणच्‍या नागरिकांसाठी इस्रायलचा गंभीर इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news