kidnappers on radar : अपहरणकर्त्यांचा विठ्ठलवाडीचा फायनान्सर रडारवर

शिकवणीला गेलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा तिच्या चौघांनी दीड कोटीच्या खंडणीसाठी गारखेडा भागातील नाथ प्रांगण येथून अपहरणाचा प्रयत्न केला होता.
kidnappers on radar
kidnappers on radar : अपहरणकर्त्यांचा विठ्ठलवाडीचा फायनान्सर रडारवर File Photo
Published on
Updated on

Vitthalwadi's financier of the kidnappers on the radar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

शिकवणीला गेलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा तिच्या आजोबाच्या गावातीलच चौघांनी दीड कोटीच्या खंडणीसाठी बुधवारी रात्री गारखेडा भागातील नाथ प्रांगण येथून अप हरणाचा प्रयत्न केला होता. कार चालक, नागरिक व मुलीच्या प्रसंगावधानामुळे तो उधळला गेला.

kidnappers on radar
Sambhajinagar Crime News : सावत्र बापाचा दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; जन्मदाती आईही बनली वैरीण

दरम्यान गुन्हे शाखेने जामखेड, विठ्ठलवाडी येथील आरोपी संदीप ऊर्फ पप्पू पवार (३२) आणि बाबासाहेब मोरे (४२) यांना अटक केली. मास्टरमाइंड गणेश मोरे व बळीराम महाजन अद्याप फरार आहेत. दरम्यान, या टोळीला अपहरणासाठी फायनान्स करणारा त्याच गावातील एक जण पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्याचाही कसून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गारखेडा भागातील नाथ प्रांगण येथे बुधवारी दहा वर्षीय मुलगी शिकवणीतून परत येत असताना चार जणांनी तिला जबरदस्तीने सँट्रो कारमध्ये ओढले. चालक नवनाथ चेडेने प्रतिकार करून पाठलाग केला. मुलीने अपहरणकत्र्यांना पोलिसांचा १०० नंबर सांगितला, तर नागरिकांनी कारवर दगडफेक केली. घाबरून आरोपींनी मुलीला सोडले. कारसह पाळताना साराराज नगरच्या गल्लीत अडकल्याने त्यांनी कार सोडून पळ काढला होता.

kidnappers on radar
Sambhajinagar Crime News : दोन विद्यार्थ्यांच्या पाठीत चाकू खुपसून मारहाण, क्लासेससमोरच दहावीचे विद्यार्थी भिडले

तांत्रिक तपास व सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी रात्रीतून संदीप पवार आणि बाबासाहेब मोरे यांना अटक केली. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः पुंडलिकनगर ठाण्यात जाऊन आरोपींची चौकशी केली होती. आरोपी व मुलीचे आजोबा हे एकाच गावचे जामखेड विठ्ठलवाडीचे आहेत.

त्यांच्याकडे मोठी संपत्ती असल्याने नातीसाठी ते मोठी रक्कम देऊ शकतात, असा प्लॅन मास्टरमाइंड गणेश मोरेने आखला होता. गणेश मोरेने १५ दिवस रेकीही केली होती. बनावट नंबर प्लेट लावलेली सँट्रो वापरली होती. पोलिसांनी बनावट नंबर, कार व मोबाईलमधील व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. आरोपींनी यापूर्वी पुण्यातही अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

दहा पथकांकडून शोध सुरू

फरार आरोपी गणेश मोरे, बळीराम महाजन हे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. गुन्हे शाखेसह पुंडलिकनगर पोलिसांची दहा पथके दोघांचा कसून शोध घेत आहेत. गणेश मोरे हाती लागल्यानंतरच कटाचा उलगडा होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news