Sambhajinagar News : अंशतः अनुदानित शाळा ७, ८ जुलैला बंद

विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला शासनाकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
sambhajinagar news
Sambhajinagar News : अंशतः अनुदानित शाळा ७, ८ जुलैला बंदpudhari photo
Published on
Updated on

Partially aided schools to remain closed on July 7 and 8

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला शासनाकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शिक्षक समन्वय संघाने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७ व ८ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

sambhajinagar news
Education News : अनुदानाच्या मागण्यांसाठी ७-८ जुलैला अंशतः अनुदानित शाळा बंद

शिक्षणाधिकाऱ्यांना सोमवारी (दि.६) याबाबत निवेदन सादर करण्यात आले. या दोन दिवसांत राज्यभरातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. शासनाने प्रलंबित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये २०, ४०, ६० आणि ८० टक्के टप्प्यावरील शाळांना १ जून २०२६ पासून वाढीव अनुदान लागू करणे, निकष पूर्ण केलेल्या शाळांना २५ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान देणे, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

sambhajinagar news
Beed news : परळीतील जिल्हा परिषद शाळा 'वाऱ्यावर'; ६२३ पैकी तब्बल ५५० शिक्षक मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण ड्युटीवर

शिक्षक समन्वय संघाने राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि सामाजिक संघटनांना आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना रवींद्र तम्मेवार, सुरेखा शिंदे, प्रदीप विखे, बंडू मस्के, भाई चंद्रकांत चव्हाण, वाहेद शेख, संतोष गोसावी, हरि मोहिते यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news