जि.प., पं.स. निवडणुकीतही पुन्हा बुम बुम भुमरे

गटाच्या ८, तर गणाच्या १७ जागा शिवसेनेने जिंकल्या
paithan political news
जि.प., पं.स. निवडणुकीतही पुन्हा बुम बुम भुमरेfile photo
Published on
Updated on

paithan zp election G.P., P.S. Bhumre

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण शहरातील नगरपरिषदेवर भगवा फडकविल्यानंतर तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटांपैकी ८, तर १८ पंचायत समिती गणांपैकी १७ जागा जिंकून पुन्हा एकदा बुम बुम भुमरे, असा जयघोष करीत तालुक्यात भगवा फडकवला आहे. या निवडणुकीत बिडकीन गटातून उबाठा गटाचे मनोज पेरे, तर एकतुनी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छाया योगेश कोठुळे यांनी बाजी मारली आहे.

paithan political news
सिल्लोड : गणांवर भाजप तर गटांवर शिवसेनेचे वर्चस्व

दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे यांनी प्रवेश करून विहामांडवा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली, मात्र त्यांचा पराभव झाला. ढोरकीन जिल्हा परिषद गटातून माजी आमदार संजय वाघचौरे यांची पत्नी सुनीता वाकचौरे यांनाही मतदारांनी नाकारले आहे.

सोमवारी नाथसागर धरणासमोरील संतपीठ येथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे, निवडणूक निरीक्षक काटकर, नायब तहसीलदार प्रभाकर घुगे, राहुल बनसोडे, अमोल पाखरे, रेवनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला.

paithan political news
वैजापूर पं. स.मध्ये शिवसेनेची बाजी

सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार लीडवर असल्याने मतमोजणी परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी शिवसेना जिंदाबाद... बुम बुम भुमरे... घोषणेने परिसर दणाणून गेला होता. नवनिर्वाचित उमेदवाराची पैठण शहरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू नाना भुमरे, नंदलाल काळे, रवींद्र काळे, दादा पाटील बारे, शेखर शिंदे शिवराज पारिक, सतीश आंधळे, नामदेव खरात, विनोद बोंबले, भूषण कावसानकर, तालुका प्रमुख अण्णासाहेब लबडे, सोमनाथ जाधव इत्यादी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

विरोधी पक्ष भुईसपाट

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ८, तर पंचायत समितीच्या १८ पैकी १७ जागा शिवसेनेने जिंकून विरोधी पक्षाला भुईसपाट केले आहे. विरोधी पक्षाला जिल्हा परिषदेच्या एक व पं.स. च्या एका जागेवर समाधान मानावे लागले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news