

पैठण : तालुक्यातील कातपूर ग््राामपंचायत हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या जागेवर वसाहत करून राहत असलेल्या राहुलनगर व संजयनगर येथील रहिवाशांच्या डोक्यावर असलेली बेघर होण्याची टांगती तलवार सध्यातरी दूर झाली आहे. प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्याचे निर्देश आमदार विलास भुमरे यांनी दिले. तसेच येथील जागा नियमानुकूल करण्यासाठी संबंधित ग््राामपंचायत विभागाला तातडीने प्रशासकीय हालचाली करण्याचे आदेश दिल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पैठण पाटबंधारे विभागाकडून राहुलनगर व संजयनगर परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. यामुळे येथील नागरिक भयभीत झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार विलासबापू भुमरे, दीपक मोरे, विजय सुते यांनी मंगळवारी भेट देऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक अतिक्रमणधारक नागरिकांशी चर्चा केली.
यावेळी आमदार विलासबापू भुमरे यांनी पाटबंधारे विभागाला स्पष्ट सूचना देत अतिक्रमण कार्यवाही तात्काळ थांबविण्यास सांगितले असून, कातपूर येथील ग््राामपंचायतीला निर्देश देऊन ग््राामसेवक यांना धारेवर धरत, या वसाहतींमध्ये आतापर्यंत कोणकोणत्या शासकीय योजना राबविण्यात आल्या, याची माहिती घेतली. तसेच रहिवाशांच्या हितासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
येत्या सात दिवसांच्या आत विशेष ग्रामसभा घेण्यात यावी. राहुलनगर व संजयनगरमधील जागा नियमानुकूल करण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव ग््राामपंचायतीमार्फत गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात यावा. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आमदार भुमरे यांच्या या भूमिकेमुळे पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला सध्यातरी बेक लागला आहे.
ग्रामपंचायतीच्या प्रस्तावाकडे लक्ष
प्रशासकीय स्तरावर जागा नियमितीकरणाची प्रक्रिया आता वेगाने राबविली जाणार असल्याने वर्षानुवर्षे येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे येणाऱ्या आठवड्यात कातपूर ग््राामपंचायत काय प्रस्ताव सादर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.