

पैठण : पैठण शहरातील कापड मंडई परिसरातील महाराष्ट्र काॅप्युटर्स या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षकांनी फिल्मी स्टाईल अपहरण केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे संतप्त झालेल्या. सकल हिंदू समाजाच्या वतीने आरोपीला तत्काळ अटक करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी रविवारी दि.१ रोजी सकाळी पैठण येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबाला न्याय देऊन विद्यार्थिनीचे अपहरण करणारा कॅम्युटर शिक्षक चिराग फारुख व त्याच्या साथीदाराला तात्काळ अटक करून विद्यार्थिनीची सुखरूप सुटका करावी व संबंधित आरोपीचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याच्या मागणी केली आहे.
यासाठी अंबड येथील गोरक्षक साध्वी धर्मसीहणी गायत्री दीदी, गोरक्षक किरण मुंडलिक यांच्यासह पैठण येथील विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व सकल हिंदू समाज, पंचक्रोशीतील कीर्तनकार मंडळी यांनी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांची भेट घेऊन या अपहरण प्रकरणी रविवारी रोजी सकाळी पैठण शहरातील खंडोबा मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन दिले आहे.