Paithan Crime | पैठण येथे काॅप्युटर्स क्लास शिक्षकाने फिल्मीस्टाईलने केले १८ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण!

पालकांमध्ये घबराट : दोन आरोपींना शोधण्यासाठी चार पोलीस पथके रवाना
Paithan Crime
Paithan Crime
Published on
Updated on

पैठणः पैठण शहरातील कापड मंडई परिसरातील महाराष्ट्र काॅप्युटर्स शिक्षण घेणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थिनीचे त्‍याच क्लासमधील शिक्षकाने फिल्मी स्टाईल अपहरण केले. ही घटना उघडकीस आल्यामुळे पैठण पोलिसांनी दोन आरोपीला शोधण्यासाठी चार पथक तयार करून शोध कार्य सुरू केले आहे या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली असून पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक माहिती अशी की शहरातील कापड मंडई परिसरात अनेक दिवसापासून महाराष्ट्र काॅप्युटर्स क्लास शिकविल्या जात असल्यामुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी सदरील कोर्स शिकण्यासाठी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. हा कोर्स शिकविण्याचे काम चिराग फारुख रा. पैठण यांनी या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या शहरातील एका कीर्तनकार महाराज यांच्या १८ वर्षीय विद्यार्थिनीला लग्नाची मागणी घातली.

या मुलीने या गोष्टीला नकार दिला. त्‍यामुळे तो शिक्षक एका अनोळखी मित्रासोबत दि.२५ रोजी MH 20 FB 4779 क्रमांकाच्या मोटर सायकलवर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान विद्यार्थिनीच्या घराच्या गेट समोर आला. त्‍याने सदरील विद्यार्थिनीला आवाज देऊन मित्राच्या मदतीने बळजबरीने हातपाय पकडून मोटर सायकलवर बसविले.

यावेळी सदरील विद्यार्थिनी आरडाओरडा करीत असल्याने या विद्यार्थिनीच्या एका नातेवाईकाच्या मुलाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु सदरील शिक्षक चिराग फारुख यांनी या मुलाला लाथानी मारहाण करून बाजूला केले व फिल्मी स्टाईलने या विद्यार्थिनीचे अपहरण केले. सदरील विद्यार्थिनीच्या पालकांनी अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर विद्यार्थिनी मुलीचा शोध न लागल्याने पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्याकडे या अपहरण प्रकरणाची तक्रार विद्यार्थिनीच्या चुलत्याने दाखल केली. या घटनेमुळे पैठण पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षक चिराग फारुख व त्याच्या एका अनोळखी मित्राचा शोध घेण्यासाठी चार पोलीस पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.

दरम्यान विद्यार्थिनीचा अपहरण करणाऱ्या सदरील शिक्षकांनी काही दिवसापूर्वी असाच एक प्रकार केल्याची चर्चा सुरू असून सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे समजते. सदरील विद्यार्थिनीचे अपहरण घटनेमुळे शुक्रवारी दि.२७ रोजी महिन्याची एकादशी असताना घबराटीचे वातावरण निर्माण झालेल्या कीर्तनकार पालकानी आरोपीला अटक करून न्याय मिळावा यासाठी पंचक्रोशीतील कीर्तनकार मंडळीने पैठण पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news