Paithan Drowned | नाथसागर धरणात किराणा व्यापारी बुडाल्याची घटना; शोधमोहीम सुरू

व्यापारी देवेंद्र खंडेलवाल नाथसागर धरणावर पोहण्यासाठी जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत
Nathsagar Dam Grocery Trader Drowned
Nathsagar Dam Grocery Trader DrownedPudhari
Published on
Updated on

Nathsagar Dam Grocery Trader Drowned

पैठण : पैठण शहरातील एका किराणा व्यापाऱ्याचा नाथसागर धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार (दि. २) रोजी सकाळी घडली. घटनेनंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलासह पैठण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण येथील रामनगर परिसरात राहणारे प्रभू किराणा दुकानाचे व्यापारी देवेंद्र कमलनारायण खंडेलवाल (वय ४५) हे सकाळी नाथसागर धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक आणि जोरदार वाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला होता.

Nathsagar Dam Grocery Trader Drowned
Paithan News : धोंडेवाडीनंतर द्वादशीला नाथनगरीत आमरसाचा गोडवा

पोहत असताना देवेंद्र खंडेलवाल यांचा पाण्यात तोल गेल्याने ते बुडू लागले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील काही तरुणांनी तातडीने पैठण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले. बचाव पथकाकडून धरण परिसरात शोधमोहीम सुरू असून वृत्त लिहिपर्यंत व्यापाऱ्याचा शोध लागलेला नव्हता.

या घटनेमुळे पैठण शहरातील व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त होत असून नाथसागर धरण परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान प्रभू किराणा मालाचे व्यापारी देवेंद्र कमलनारायण खंडेलवाल नाथसागर धरणावर पोहण्यासाठी जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसलेले छायाचित्र प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news