Paithan News : धोंडेवाडीनंतर द्वादशीला नाथनगरीत आमरसाचा गोडवा

पैठण येथील नाथ संस्थानचा उपक्रम : ३ क्विंटल रसाचा महाप्रसाद, हजारो वारकऱ्यांनी घेतला आस्वाद
Paithan News
Paithan News : धोंडेवाडीनंतर द्वादशीला नाथनगरीत आमरसाचा गोडवाfile photo
Published on
Updated on

After Dhondewadi, the sweetness of Aamras is savoured in Nathnagari on Dwadashi

पैठण, पुढारी वृत्तसेवा : कमला एकादशी अर्थात धोंडेवाडीचा सोहळा भक्तिमय वातावरणात गुरुवारी पार पडून लाखो वारकरी व भाविकांनी श्री संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर द्वादशीच्या दिवशी नाथनगरीत महाप्रसादाचा गोडवा अनुभवायला मिळाला. यावेळी तब्बल तीन क्विंटल आंब्याचा रस तयार करून महाप्रसादामध्ये वाढण्यात आला. द्वादशीच्या दिवशी आमरसाचा आस्वाद घेवुन वारकरी व भाविकांनी समाधान व्यक्त केले. नाथ संस्थानच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

Paithan News
Parbhani News : मिनी मंत्रालयासाठी सरासरी ७१ टक्के मतदान

श्री संत एकनाथ महाराज नाथ संस्थानच्या वतीने वारकरी व भाविकांसाठी विशेष महाप्रसादाचे आयोजन नाथ संस्थांनचे अध्यक्ष आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

पवित्र धोंड्याचा महिना सुरू असल्यामुळे गुरुवारी संपन्न झालेल्या एकादशीनिमित्त राज्याच्या काराकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त नाथांच्या दर्शनासाठी आले होते तसेच हजारो भाविक भक्तांनी गोदावरीत स्नान करून गोदावरीला धोंडे अर्पण केले.

एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी झालेली लाखोंची गर्दी आणि त्यानंतर द्वादशीला प्रेमाने वाढण्यात आलेला महाप्रसाद यामुळे पैठणची वारी भक्त्ती, सेवा आणि प्रसादाच्या परंपरेचा सुंदर संगम ठरली आहे.

महाप्रसादामध्ये आमरसासह गुळाची लापशी, वरण-भात, पुरणाचे धोडे, आणि पोळीचा समावेश होता. सकाळपासूनच महाप्रसादासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. सेवेकरी आणि नाथ संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध नियोजन करत हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला. यासाठी नाथ संस्थांनचे अध्यक्ष आमदार विलास भुमरे संस्थांनचे विश्वस्त दादा पाटील बारे,

Paithan News
काला दहीहंडी फोडून सांगता

शहादेव लोहारे, विठ्ठलशास्त्री चनघटे महाराज, कैलास बोबडे, गजानन झोल सह सेवेकरी जयराम फासाटे, चव्हाण तात्या, भानुदास पोटफोडे खटकळ, नाना औटे, ऋषी लघाने, मस्के सह आदींनी वारकऱ्यांना सेवा दिली.

वारकऱ्यांत समाधान

खासदार संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ मंदिर परिसराचा कायापालट झाला असून विविध विकास कामे या परिसरात सुरू आहे. धोंडेवारी निमित्त आलेल्या वारकऱ्यांनाआज तीनशे क्विंटल आंब्याचा रस करण्यात आला होता. वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असे नाथ संस्थान अध्यक्ष आमदार विलास भुमरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news