Paithan Municipal Council | पैठण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी तुषार पाटील बिनविरोध

नगराध्यक्षा विद्याताई कावसानकर यांनी स्वीकारला पदभार
Tushar Patil  Unopposed Election
पैठण नगराध्यक्षपदाचे सूत्र आमदार विलास बापू भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्या भूषण कावसानकर तर उपनगराध्यक्षपदाची पदभार तुषार पाटील यांनी घेतलाPudhari
Published on
Updated on

Tushar Patil Unopposed Election

पैठण : पैठण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शहरप्रमुख तुषार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्याताई भूषण कावसानकर यांनी सोमवार (दि. १२) रोजी नगरपरिषद कार्यालयात आयोजित पदग्रहण समारंभात नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.

माता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पदग्रहण समारंभ पार पडला. याच वेळी उपनगराध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली असून, शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक तुषार पाटील यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

Tushar Patil  Unopposed Election
Paithan News |पोलिसांनी कारवाई करून देखील पैठण येथील गोवंश मांस विक्री बंद होईना....!

या समारंभास आमदार विलास बापू भुमरे, दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नाथसंस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पासाहेब निर्मळ, भाऊसाहेब तरमळे, अक्षय जायभाये, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, भूषण कावसानकर तसेच सर्व नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार विलास भुमरे यांनी भाषणात सांगितले की, पैठण शहरातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांवर विश्वास टाकून त्यांना मोठे बहुमत दिले आहे. आगामी काळात शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवाव्यात, असे आवाहन केले.

Tushar Patil  Unopposed Election
Illegal Sand Mining Paithan | गोदावरी नदीतील अवैध वाळू तस्करीविरोधात पैठण पोलिसांची कारवाई; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

नगराध्यक्षा विद्याताई कावसानकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता व वीज या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक व शहरवासीयांना विश्वासात घेऊन स्वच्छ व सुंदर पैठण घडविण्यासाठी कार्य केले जाईल. तसेच शहरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत पैठणच्या विकासासाठी व नावलौकिकासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तुषार पाटील यांच्यासह नगरसेवक विलास आडसुळ, कविता शेखर शिंदे, वीर करकोटक, स्नेहल धुपे, राजश्री राजू गायकवाड, ईश्वर दगडे, संगिता ज्ञानेश्वर मापारे, वैशाली परदेशी, महेश मुंदडा, अलकाबाई परदेशी, बजरंग लिंबोंरे, गोवर्धन टाक, मंगल सुनील हिंगे, गौरव आठवले, पठाण आसिफा बेगम कासमखान, दिपाली सोनारे, अनिता रमेश वीर, रफीक कादरी, मनिषा साळवे, हसनोद्दीन कटयारे, योगिता वरकड, पूजा पारीख, ज्ञानेश्वर दहिवाळ यांच्यासह पैठणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news