

पैठणः पैठण तालुक्यातील कडेठाण येथे मुलाने बापाचा खून करून मृतदेह घरात पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने ही गंभीर घटना उघडकीस आली असून. महसूल, वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मयतचे नाव कल्याण बापूराव काळे वय ६५ ता. कडेठाण ता.पैठण असे असून आरोपी मुलगा रामेश्वर कल्याण काळे वय ३८ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आहे अधिक माहिती अशी की तालुक्यातील कडेठाण येथील कल्याण बाबुराव काळे याचे आठ दिवसांपूर्वी कुठल्यातरी कारणाने मुलाबरोबर वाद झाला. यास रागातून आरोपी मुलगा रामेश्वर कल्याण काळे यांने बापाचा खून केला.
खून केल्यानंतर रामेश्श्वर याने बापाचे प्रेत आठ दिवसापूर्वी घरामध्ये खड्डा मारुन पुरून ठेवले होते. परंतु मृतदेह सडू लागल्यामुळे घरातील दुर्गंधी दिवसेंदिवस वाढू लागली. यामुळे हा प्रकार मयताच्या पत्नीने आपल्या नातेवाईकांना सांगितला. या घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित यांना देण्यात आली. त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, वैद्यकीय पोलीस पथक घटनास्थळ जाऊन घरात पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी आरोपी रामेश्वर कल्याण काळे या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.