Paithan Accident| दोन दुचाकींच्या अपघातात पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन मृत्यू झालेल्या वडीलांनंतर 6 वर्षीय चिमुकल्याचाही उपचारादरम्यान मृत्‍यू

परिसरात हळहळ, भीषण अपघातामुळे वडीलांपाठोपाठ मुलावरही काळाचा घाला, २२ मार्च रोजी घडला होता अपघात
Paithan Accident | दोन दुचाकींच्या भीषण धडकेत पेट्रोल टाकीचा स्फोटः
Paithan Accident
Published on
Updated on

पैठण :- पैठण शेवगाव रोडवरील पाटेगाव शिवारात दि.२२ रोजी दोन दुचाकीच्या अपघात होऊन पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्यामुळे जितेंद्र हरिचंद्र काळे रा.खडका तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर याचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये पेट्रोल टाकीवर बसलेल्या सहा वर्षाचा निखिल जितेंद्र काळे वय ६ वर्ष हा बालक जखमी झाला होता. त्याच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर मंगळवारी दि.२४ रोजी सायंकाळच्या दरम्यान आपला प्राण सोडला . या घटनेमुळे काळे कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याने गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

दोन दिवसांपूर्वी पैठण येथे मुलाला उपचारासाठी घेऊन आलेल्या जितेंद्र हरिश्चंद्र काळे रा. खडका जिल्हा अहिल्यानगर आपल्या कुटुंबासोबत मुलावर उपचार करून गावाकडे परत जात असताना पैठण शेवगाव रोडवरील पाटेगाव परिसरात समोरून येणाऱ्या मोटर सायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मयत जितेंद्र काळे यांच्या मोटरसायकलीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन यामध्ये जितेंद्र काळेचा जागेवरच मृत्यू झाला होता.

मोटर सायकलच्या पेट्रोल टाकीवर बसलेल्या निखिल जितेंद्र काळे वय ६ वर्ष गंभीर भाजून जखमी होऊन त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस उपचार सुरू असताना मंगळवारी दि.२४ रोजी सायंकाळी निखिल काळे या बालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी पैठण पोलिसाने युनिकॉन होंडा मोटरसायकल क्रमांक एम. एच २०-एच.ए ३९६३ निष्काळजीपणाने मोटरसायकल चालवून जितेंद्र काळे यांच्या मरणास कारणीभूत ठरल्यामुळे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर हे करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news