HSRP Number Plate : ३ लाखांपेक्षाही जास्त हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवल्या

अद्यापही २ लाख ९७ हजार वाहनधारक नोंदणीपासून दूरच
HSRP Number Plate
HSRP Number Plate : ३ लाखांपेक्षाही जास्त हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवल्या (Pudhari File Photo)
Published on
Updated on

Over 3 lakh high-security number plates installed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याभरातील सुमारे ४ लाख २७ हजार वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एच.एस.आर.पी.) बसवण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी आजपर्यंत ३ लाख ६५ हजार ७९७वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यातील सुमारे २ लाख ९७ हजार ३०० वाहनधारकांनी या नंबर प्लेटसाठी नोंदणीच केली नाही. याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली आहे. त्यानंतर मात्र याला मुदतवाढ मिळणार की कारवाई होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने अधिकारी आणि वाहनधारकांत संभ्रमाचे वातावरण आहे.

HSRP Number Plate
एसआयटीची मुदत संपली, शालार्थचा तपास अर्धवट

२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ डिसेंबर-२०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एच.एस.आर.पी.) बसवून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मुदत संपल्यानंतरही पुढे काय याबाबत परिवहन खात्याकडून काहीच सूचना आल्या नसल्या तरी वाहनधारकांची नोंदणी आणि नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया मात्र सुरू आहे.

आजपर्यंत सुमारे ४ लाख २७ हजार वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३ लाख ६५ हजार ७९७ वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २०१९ पूर्वीची सुमारे ७ लाख वाहने आहेत. आजही सुमारे २ लाख ९७हजार ३०० वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली नाही.

HSRP Number Plate
हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू

वाहनधारकांना दिलासा

अद्यापही २ लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणीच केली नाही. दरम्यान, मुदत संपण्याआधी नोंदणीचा वेग वाढला होता. मुदतीनंतरही नोंदणी सुरूच असल्याने वाहनधाकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मुदत वाढवून मिळणार की कारवाई होणार, याबाबत मात्र अधिकाऱ्यांसह वाहनधारकांत संभ्रम निर्माण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news