Sambhajinagar News : जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतरावरून मंत्री विखे-पाटील यांच्या विरोधात संताप

निर्णयाविरोधात शुक्रवारी (दि.१२) मराठवाडा सर्वपक्षीय संयुक्त समितीच्या नेतृत्वाखाली सिंचन भवनावर आक्रमक महामोर्चा काढण्यात आला.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतरावरून मंत्री विखे-पाटील यांच्या विरोधात संतापfile photo
Published on
Updated on

Outrage against Minister Vikhe-Patil over the relocation of Water Resources Department offices

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यातील जलसंपदा विभागाची १४ कार्यालये इतरत्र तर मुख्य अभियंत्यांचे कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी (दि.१२) मराठवाडा सर्वपक्षीय संयुक्त समितीच्या नेतृत्वाखाली सिंचन भवनावर आक्रमक महामोर्चा काढण्यात आला. सेव्हन हिल परिसरातून निघालेला मोर्चा जालना रोडवरील सिंचन भवनासमोर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात निषेध नोंदवत स्थलांतराचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.

Sambhajinagar News
Radhakrishna Vikhe Patil : डावा कालवा दुरुस्तीचे काम दीड वर्षात होणार

मोर्चात मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड, काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, कम्युनिस्ट नेते अॅड. अभय टाकसाळ, जिल्हा परिषद सदस्या विद्या गायकवाड, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, रमेश जायभाय, प्रतीक गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, मराठवाड्याचा द्वेष करणारे मंत्री विखे-पाटील मुर्दाबाद आणि जलसंपदामंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलकांनी स्थलांतराच्या निर्णयाविरोधातील फलकही झळकावले. मराठवाड्याला समन्यायी पाणीवाटप मिळेपर्यंत आणि कार्यालयांचे स्थलांतर रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी सिंचन भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

Sambhajinagar News
Radhakrishna Vikhe Patil Development: विकासासोबत रोजगारनिर्मितीला प्राधान्य: मंत्री विखे पाटील

सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनानंतर रमेश गायकवाड आणि खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी गवळी यांनी मराठवाड्यातील जनभावना व मागण्या तांत्रिक अहवालासह राज्य शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.

मंत्री विखे यांच्या प्रतिमेवर अंडीफेक

मुख्य प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स उभारून प्रवेश रोखण्यात आल्याने आंदोलकांनी गेटबाहेरच रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री विखे-पाटील यांच्या प्रतिमेवर अंडीफेक करत आपल्या भूमिकेचा निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ जालना रोडवरील वाहतुकीवर परिणाम झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news