

Order issued to rename railway station
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर येथील रेल्वेस्थानकाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, १४ ऑक्टोबर रोजी नामांतराचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच रेल्वेस्थानकावर छत्रपती संभाजीनगर नाव झळकणार आहे.
राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर केल्यानंतर जिल्ह्यातील राज्य शासनाच्या अधिनस्त सर्व शासकीय -निमशासकीय कार्यालयांचे नामांतर करण्यात आले. दरम्यान, काही कार्यालये केंद्राच्या अधिन असल्याने त्यांच्या नामांतरासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यात रेल्वेस्थानकाचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, राज्य शासनाने १४ ऑक्टोबर रोजी आदेश पारित करत रेल्वेस्थानकाचे नामांतर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक करण्याचे आदेश जारी केले आहेत.