

Opposition to the appointment of teachers for election duty.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिका निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीने आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. अनेक शाळा द्विशिक्षकी आहेत. अशा परिस्थितीत प्रशिक्षण व निवडणूक कामासाठी अनेक दिवस जात असल्याने अध्यापनावर परिणाम होत असल्याचे संघटनेने नमूद केले.
महानगरपालिका हद्दीतील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांची आधी नियुक्ती करावी, तसेच दिव्यांग, गंभीर आजारी, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अस-लेले व बीएलओ कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळावे आणि मतदानानंतरच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे संतोष ताठे, राजेश भुसारी, महेंद्र बारवाल, प्रवीण संसारे, देवा सुरडकर, बाबासाहेब शिंदे, विजय ढाकरे आदींनी केली आहे.