Sambhajinagar News : कांचनवाडीत रस्ता मार्किंगला विरोध, नागरिकांनी मनपा पथकाला रोखले

वक्फ बोर्डच्या जागेत बेकायदा इमारती
Sambhajinagar News
Sambhajinagar News : कांचनवाडीत रस्ता मार्किंगला विरोध, नागरिकांनी मनपा पथकाला रोखले File Photo
Published on
Updated on

Opposition to road marking in Kanchanwadi, citizens stopped the Municipal Corporation team

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नाथव्हॅली स्कूल ते कांचनवाडी या विकास आराखड्यातील मंजूर ३६ मीटर रस्त्याचे लवकरच रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठी शनिवारी महापालिकेचे पथक परिसरात गेले होते. परंतु, वक्फ बोर्डाच्या जागेत विनापरवानगी बांधकाम करून राहणाऱ्यांनी मार्किंगला विरोध करीत पथकाला परतावून लावले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : क्रांती चौकात आमदार-खासदार यांच्या विरोधात अनोखे आंदोलन

नाथव्हॅली स्कूल ते कांचनवाडी चौक हा ३६ मीटर रुंदीचा रस्ता आहे. हा रस्ता २००१ च्या विकास आराखड्यानुसार मंजूर आहे. परंतु, या भागातील काही राजकीय मंडळींनी व भूमाफियांनी वक्फच्या जागा विक्री करून त्यावर टोलेजंग इमारती उभारण्यास भाग पाडले. मुख्य रस्त्यापासून साधारणपणे ७०० मीटरपर्यंत गटनंबर १० मध्ये ३६ मीटर रस्त्याच्या जागे वरच अतिक्रमण झाले. अतिक्रमणे होऊन देखील त्याकडे दुर्लक्ष झाले.

या भागात राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू झाले आहे. या विधी विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी येतात. या रस्त्यानेच त्यांना विधी विद्यापीठात जावे लागते. वाहनांचा ताफा असल्यामुळे कधी कधी रस्त्यात वाहतूक ठप्प होते.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : युवा सेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विराेधात आंदाेलन

त्यावरून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी हा ३६ मीटर रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने आता या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. विकास आराखड्याप्रमाणे हा रस्ता ३६ मीटर रुंदीचा होणार आहे. त्यासाठी शनिवारी महापालिका प्रशासकांच्या आदेशावरून नगररचनाचे उपसंचालक मनोज गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बाळासाहेब शिरसाट यांच्या नेतृत्वात सहायक नगररचनाकार शिवाजी लोखंडे पाटील व त्यांच्या पथकाने या भागात जाऊन रस्त्यासाठी मोजणी आणि मार्किंगची प्रक्रिया केली. परंतु, वक्फच्या जागेत बेकायदा बांधकाम करून राहणाऱ्यांनी मनपाच्या पथकाला तीव्र विरोध केला. रास्ता रोको करून पथकाला परतावून लावले.

जागेच्या मोबदल्यात जागा द्या

महापालिकेने रस्ता रुंदीकरण करताना जर आम्हाला किमान जागेचा मोबदला द्यावा. नसता जागेच्या बदल्यात जागा द्यावी. तेव्हाच या रस्त्यासाठी मार्किंग करण्यास आणि पाडापाडीला सहकार्य करू, अशी मागणी विरोध करणाऱ्या नागरिकांनी केली.

मोकळ्या जागेत मार्किंग पूर्ण

महापालिकेच्या पथकाने शनिवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात व नागरी मित्र पथकाच्या उपस्थितीत कांचनवाडी चौक ते नाथव्हॅली स्कूलपर्यंतच्या रस्त्यावर मार्किंगला सुरुवात केली. नाथव्हॅली स्कूल ते नागपाल ग्रुपच्या हौसिंग सोसायटीपर्यंत मार्किंग केल्यानंतर पथक पुढे जातच त्यांना नागरिकांनी विरोध केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news