Sambhajinagar News : क्रांती चौकात आमदार-खासदार यांच्या विरोधात अनोखे आंदोलन

छावाच्या विविध संघटनांकडून रम्मी व बॉक्सिंग स्पर्धांतून निषेध
Sambhajinagar News
Sambhajinagar News : क्रांती चौकात आमदार-खासदार यांच्या विरोधात अनोखे आंदोलन File Photo
Published on
Updated on

Unique protest against MLAs and MPs at Kranti Chowk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील मंत्र्यांचा बेजबाबदार व गुंडगिरीचा कारभार, विधानभवनातील वागणूक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविर-ोधात छावाच्या विविध संघटनाच्या वतीने शनिवारी (दि.२) क्रांती चौकात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रम्मी पत्ते आणि बॉक्सिंग स्पर्धांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

Sambhajinagar News
Sambhajinagar Crime News : लग्नाच्या स्वागत समारंभात नवरदेवावर चाकूने वार

याप्रसंगी खासदार, आमदार व मंत्र्यांच्या वागणुकीचा तीव्र निषेध करत आंदोलकांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार संजय गायकवाड, गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड, मंत्री संजय शिरसाट, उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला.

यावेळी कोकाटे मुर्दाबाद, मनालायक सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय ! कर्जमाफी आमची हक्काचीफअशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून टाकण्यात आला.

Sambhajinagar News
बांधकामाचा खड्डा ठरला मृत्यूचा सापळा; दोन निष्पाप जीवांचा करून अंत

आंदोलनात प्रा. चंद्रकांत भराट, अशोक मोरे, जयाजी सूर्यवंशी, निवृत्ती डक, राजीव थिटे, अरुण नवले, प्रभाकर मते, विजय काकडे, नितीन कदम, लक्षण टेळे, नानासाहेब पळसकर, आत्माराम शिंदे, दत्तात्रय घारे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी यावेळी सहभागी झाले होते.

विजेत्यांना चाबकांच्या फटक्यांचे बक्षीस

रम्मी स्पर्धा व कुस्ती/बॉक्सिंग स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मविजेत्यांनाफचाबकांचे फटके बक्षीस देण्यात आले. यावेळी शेतकरी, कामगार, नोकरदार, विद्यार्थी, महिला अशा विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. काही आंदोलकांनी मंत्र्यांचे प्रतीकात्मक फोटोला चाबकाचे फटके देत तीव्र रोष व्यक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news