Bribe Case : जन्म प्रमाणपत्रासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना एकाला अटक

एसीबीचा सापळा; कामावरून कमी करूनही सुरू होती 'एजंटगिरी'
Bribe Case
Bribe Case : जन्म प्रमाणपत्रासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना एकाला अटकFile Photo
Published on
Updated on

One person arrested while accepting a bribe of ₹5,000 for a birth certificate

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कार्यालयातून मुलाचे जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (दि.५) रंगेहाथ पकडले. ही कारवाई दुपारी ३ वाजेच्या सुमारास मनपाच्या झोन-७ कार्यालयात करण्यात आली. विशेष म्हणजे, या आरोपीला मार्च महिन्यातच कामावरून कमी करण्यात आले होते, तरीही तो कार्यालयात बिनदिक्कतपणे 'एजंटगिरी' करत असल्याचे समोर आले आहे.

Bribe Case
Tree Plantation : फुलंब्रीत १.६५ कोटींचे वृक्षारोपण कागदावरच

या प्रकरणातील ३८ वर्षीय तक्रारदाराने आपल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १० जुलै रोजी मनपाच्या झोन-७ कार्यालयात अर्ज दिला होता. अर्ज दिल्यानंतर या कार्यालयात त्यांची भेट कुणाल कविकर याच्याशी झाली. कुणालने त्यांना जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली.

एसीबीने ५ ऑगस्ट रोजी दुपारी पडताळणी केली असता, कुणाल कविकर याने तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. झोन-७कार्यालयात सापळा रचला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच खिशातून रुमाल काढून तोंड पुसून इशारा केला आणि पथकाने कविकर याला रंगेहाथ ताब्यात घेतले जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Bribe Case
E-Office Server Down : ई-ऑफिस सर्व्हर ठप्प, महापालिकेचे कामकाज खोळंबले

ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपन अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, शांतीलाल चव्हाण राजेंद्र नंदिले, अंमलदार सचिन बारसे आणि रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली.

स्मार्ट सिटी अंतर्गत चार वर्षे कंत्राटी कर्मचारी

आरोपी कुणाल कविकर हा स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जून २०२२ साली 'मार्स' कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने कामाला लागला होता. त्याला मनपाच्या झोन क्र. ७कार्यालयात 'खासगी ऑपरेटर' म्हणून नियुक्त करण्यात आले होते. काही कारणास्तव त्याला मार्च २०२६ मध्ये कामावरून कमी करण्यात आले होते. मात्र तरीही अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत तो दररोज झोन कार्यालयात येऊन 'एजंटगिरी' करत लोकांची कामे करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news