

One killed after tractor falls into well
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा
शेत नांगरताना ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने शेतकरी ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.४) दुपारी दोन वाजेदरम्यान तालुक्यातील बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ते आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरत होते. त्यावेळी शिवारातील कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने ते ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तसेच वीरगाव पोलिसांना संपर्क करून त्यांना माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.
विहीर जवळपास ७० फूट खोल असल्याने व त्यात जास्त पाणी असल्याने पाणी काढून त्यानंतर क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले व त्यानंतर शेतकरी अमोल गिरी यांना बाहेर काढले. गिरी यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
अवकाळी पावसामुळे शेती मशागतीला आधीच विलंब झाला आहे. खरिप तोंडाव असल्याने शेतकरी नांगरीणीसह इतर कामात सध्या शेतकरी व्यस्त आहेत. शेतात नांगरणी करताना कठडे नसलेल्या विहिरीशेजारी नांगरणी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी शेतकऱ्यांना केले आहे.