Sambhaji Nagar News : खोटे सोने तारण ठेवून लाटले कोट्यवधींचे कर्ज
Loans worth crores were taken by pledging fake gold as collateral
नितीन थोरात
वैजापूर : शहरातील बँकांमध्ये खोटे सोने तारण ठेवून कर्ज लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकांमध्ये सोने पडताळणी करणाऱ्यानेच खोटे सोने ठेवून इतरांच्या नावावर कर्ज लाटल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर येताच बँकांचे धाबे दण णले असून, कर्ज भरून सोने परत नेण्यासाठी ठेवीदारांवर दबाव आणला जात आहे. फसवणूक करणारा पसार झाला असून, फसवणूक झालेल्या कर्जदारांनी वैजापूर पोलिसांत धाव घेतली आहे आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय बँकेसह खासगी बँकांमध्ये सोने पडताळणी करणाऱ्यानेच खोटे सोने तारण ठेवून कर्ज लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे बँकांमध्ये सोने पडताळणी करणाऱ्यानेच खोटे सोने ठेवून इतरांच्या नावावर कर्ज लाटल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार समोर येताच बँकांचे चांगलेच धाबे दणाणले असून, कर्ज भरून सोने परत नेण्यासाठी बँक ठेवीदारांवर दबाव टाकत असल्याची प्रतिक्रिया खातेदार देताना पाहायला मिळत आहे.
पोटाळ्याचा सूत्रधार कमलेश अधिकारी कुटुंबीयांसह पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. फसवणूक करणारा आपल्या कुटुंबासह पसार झाला असून, फसवणूक झालेल्या कर्जदारांनी वैजापूर पोलिसांत धाव घेतली आहे. आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शाखाधिकाऱ्याची चुप्पी
ज्या बँकेवर खातेदारांनी आरोप केले आहे त्या जनता सहकारी बैंकर्वेकच्या वैजापूर शाखाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असतो. मी आज दिवसभर बाहेर आहे. आज मी शाखेत येणार नाही. आल्यावर प्रत्यक्ष बोलतो असे म्हणाले.
या सर्व प्रकाराविषयी भारतीय स्टेट बँकेला विचारले असता, सध्या मला या प्रकरणात काहीही प्रतिक्रीया देता येणार नाही. जोपर्यंत रिजनल ऑफिसकडून काही सूचना मिळत नाहीत, तोपर्यंत मी यावर काहीही बोलणार नाही.
नवनीत शर्मा, शाखाधिकारी, एसबीआय बँक.

