

On the occasion of Water Day, a pledge for water conservation was taken
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जागतिक जल दिनानिमित्त भारतातल्या पहिल्या जलसाक्षरता केंद्र, राज्य राखीव दल सातारा परिसरामध्ये जल प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वांना पाणी संवर्धनाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमात राज्य राखीव दलाच्या कमांडंट विक्रम साळी यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. प्रियानंद आगळे यांनी पाण्याचे महत्व समजून सांगितले. या जलसाक्षरता केंद्रामध्ये जलसंवर्धनाचे जवळपास १०० स्ट्रक्चर बनवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणचा एक थेंबही पाणी वाहून जात नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढत आहेत.
जमिनीची धूप पूर्णपणे थांबली आहे. येणारा काळात या ठिकाणी लवकरच पाण्याचे पुस्तकालय परीक्षण प्रयोगशाळा व थेटर बनणार आहे. इको निडस फाऊंडेशनने २० मार्चपासून हा जल हक्क सप्ताह म्हणून साजरा करण्याचे काम सुरू केले आहे.
यामार्फत जन-तेला पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी मागणी लोकांमध्ये रुजवण्याचे काम जागोजागी करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपक सरदार, अॅड. अतः दीप आगळे, संतोष जाधव आदींनी परिश्रम घेतले