Sambhajinagar News : ज्युबली पार्ककडे येणारी जलवाहिनी फुटली

रमजान ईदला पाणीबाणी, टप्पे एक दिवसाने पुढे
Sambhajinagar News
Sambhajinagar News : ज्युबली पार्ककडे येणारी जलवाहिनी फुटलीfile photo
Published on
Updated on

Water pipeline leading to Jubilee Park bursts

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी गुरुवारी (दि.१९) पहाटे २ वाजता ज्युबली पार्कजवळ फुटली. त्यामुळे सकाळीपर्यंत जलवाहिनी रिकामी करून दुरुस्ती सुरू करण्यात आली.

Sambhajinagar News
गॅपमुळे नक्षत्रवाडीजवळ मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम अपूर्ण

मात्र हे काम पूर्ण होण्यास जास्तीचा कालावधी लागणार असल्याने सुमारे २० हून अधिक वसाहतींचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला आहे. त्यामुळे ऐनगुढीपाडवा आणि रमजान ईदच्या दिवशी या वसाहतीतील रहिवाशांवर पाणीबाणीचे संकट निर्माण झाले आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न कायम आहेत. त्यात गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशनकडून ज्युबली पार्ककडे या वसाहतींना फटका अचानकजलवाहिनी फुटल्याने बुढीलाईन, जुना बाजार, आसफिया कॉलनी, जयभीमनगर, घाटी परिसराला फटका बसणार आहे. येणारी ७०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली.

Sambhajinagar News
Sambhajinagar water supply project : जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

जलवाहिनीचा दाब एवढा मोठा होता की, काही वेळातच रस्त्याला नदीचे स्वरूप आले. मात्र महापालिका पाणीपुरवठा विभागाला माहिती मिळाल्यानंतर रेल्वेस्टेशन गेटसमोरील व्हॉल्व्ह बंद केला. मात्र या तांत्रिक बिघाडामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असले, तरी या भागातील पाणीपुरवठा आता एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news