Sambhajinagar News : विनापरवाना मांसविक्री करणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा

१० विक्रेत्यांना नोटिसा : सात जणांकडून ११ हजारांचा दंड वसूल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Municipal Corporation cracks down on unlicensed meat sellers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात उघड्यावर तसेच महापालिकेची परवानगी न घेता मांसविक्री करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. मनपा पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. २१) शहर परिसरातील मांसविक्री केंद्रांची तपासणी केली. यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, सात जणांकडून ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Crime News
Saksham App : महापालिकेकडून दिव्यांगांसाठी सक्षम ॲप

शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर मांसविक्री केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. संबंधित विक्रेत्यांनी महापालिकेची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचेही तपासणीत निदर्शनास येत आहे. यापूर्वी पशुसंवर्धन विभागाने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना सात दिवसांत आवश्यक परवानगी घेण्याचे आवाहन केले होते.

मुदतीत परवानगी न घेतल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आवाहनानंतरही अनेक विक्रेत्यांनी परवानगी घेतली नसल्याने महापालिकेने बुधवारी (दि. १९) कारवाईला सुरुवात केली. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पुन्हा तपासणी मोहीम राबविण्यात आली.

Crime News
Solar Power Project : वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी मनपाचा सौरऊर्जा प्रकल्प

या कारवाईत दहा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई उद्यान अधीक्षक तथा पशुसंवर्धन विभागप्रमुख विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनंत जाधव, रवींद्र घडमोडे, लक्ष्मण फुले आणि बाळासाहेब तुपे यांच्या पथकाने केली.

कारवाई सुरूच राहणार

मांसविक्रेत्यांनी उघड्यावर विक्री न करता महापालिकेची आवश्यक परवानगी घेऊनच व्यवसाय करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. परवानगीशिवाय सुरू असलेल्या विक्रीविरोधात तपासणीची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे उद्यान अधीक्षक तथा पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख विजय पाटील यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news