

On a holiday, Dean made rounds in the wards in the Ghati Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घाटीतील विविध वॉर्डातील रुग्णसुविधेचा आढावा घेण्यासाठी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रविवारी (दि.२) सुटीच्या दिवशीही कडक राऊंड घेतला. यावेळी एका वॉर्डात रुग्ण व नातेवाइकांसाठी अस-लेले स्टील बाकडे चक्क कर्मचाऱ्यांनीच लाटल्याचे बघून अधिष्ठातांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ते बेंच तुमच्यासाठी नसून, ताबडतोब बाहेर काढा, असे फर्मान अधिष्ठातांनी देताच कर्मचाऱ्यानी बेंच हलवले.
गोरगरीब, गरजू रुग्णांसाठी आध ारवड असलेल्या घाटीत दीड-दोन वर्षांत आमूलाग्र बदल झाला आहे. मोफत औषधींसह महागडे उपचारही निःशुल्क मिळत असल्याने घाटीवर रुग्णांचा भरोसा वाढला आहे. यामुळे येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्याने त्यांना आवश्यक उपचारसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. सुक्रे हे स्वःत याकडे लक्ष देऊन वेळोवेळी आढावाही घेत असतात.
काही दिवसांपूर्वी अचानक रात्री त्यांनी विविध वॉर्डातील रुग्णसुविधेची पाहणी केली. रविवारी सुटीच्या दिवशी दुपारी अचानकपणे डॉ. सुक्रे यांनी परिसरातील सोयीसुविधांची पाहणी केली. यानंतर अपघात विभाग, आर्थो विभागासह विविध वॉर्डातील रुग्णसुविधेचाही आढावा घेतला. सुटीच्या दिवशीही अधिष्ठाता वॉर्डात धडकल्याने परिचारिका, आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेत तत्पर दिसून आले.
बेशिस्त वाहनांसाठी पार्किंगचे नियोजन
घाटीतील बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्यासाठी पार्किंगचे नव्याने नियोजन सुरू आहे. सुटीच्या दिवशी राऊंड घेताना अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी परिसरात कुठे-कुठे कशी वाहने उभी करता येईल, याचा अंदाज घेतला. त्यानुसार सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.