

Amol Khotkar Case Waluj dacoity accused Old Video
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
एका गोळीची किंमत एक कोटी रुपये, सुपारी ह्या कोणालाही १०० टक्के संपवितो याची खात्री, असे म्हणत एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेला कुख्यात दरोडेखोर अमोल खोतकरचा पिस्तूल साफ करतानाचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
त्याच्याजवळ तीन पिस्तूल दिसत असून, स्वतःला तो मोस्ट वॉन्टेड, खुंखार, आदमखोर असल्याचेही सांगत आहे. ज्याने हा व्हिडिओ शूट केला आहे, तो खोतकरकडे एके-४७ सह अनेक हत्यार असल्याचे सांगतो आहे. अंडरवर्लड डॉन दाऊदलाही संपविण्याच्या वलझा करताना तो दिसतो आहे. व्हिडिओ जुना असला तरी खोतकरच्या टोळीत आणखी कोण होते, हे अद्यापही पुढे आले नाही.
कुख्यात गुन्हेगार अमोल खोतकरने बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्न यांच्या बंगल्यात दरोडा टाकून १६ मे रोजी साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदीसह कोट्यवधींचा ऐवज लुटून नेला होता, त्यानंतर २६ मे रोजी साजापूर रोडवर गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे यांनी खोतकरचे एन्काउंटर केले.
टोळीतील त्याचे साथीदार योगेश हाजवे, सुरेश गंगणे, सय्यद अझरोद्दीन, सोहेल शेख, महेंद्र बिडवे गजाआड झाले. या गुन्हगत पोलिसांनी आतापर्यंत खोतकरची बहीण रोहिणीसह तब्बल २१ आरोपी अटक केले. आरोपीकडून ७९४ ग्रॅम सोने, ३२ किलो चांदी, ८ लाखांची रोख, ३ चारचाकी एक दुचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त केला.
उर्वरित सोने अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. दरम्यान, खोतकरकडे अनेक पिस्तूल, घातक शत्र असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे एन्काउंटर झाले असले तरी त्याच्या टोळीतील अन्य गुन्हेगार कुठे आहेत? त्यांच्याकडे काही शखे आहेत का? दरोड्यात खोतकर टोळीतील आणखी सदस्य सक्रिय होते का? ते पोलिसांच्या नजरेत अद्याप आले नाहीत का? अशा शक्यता वर्तविल्या जात आहेत.
व्हिडिओत खोतकर हा ३ पिस्तूल साफ करताना दिसून येत आहे. तर हत्येची सुपारी असेल तर द्या, असे व्हिडिओ रेकॉर्ड करताना म्हणत आहे. गोळ्यांची किमत साधी नाही, १ सुपारी १ कोटी रुपयांमध्ये घेतली जाते. १०० टक्के समोरच्याला संपवणार ही खात्री, असे वाक्य अमोल खोतकर बोलताना दिसून येत आहे. मर्डर किंग, किंग ऑफ मर्डर अशा उपमा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती अमोलला देत आहे. तर पिस्तुलांजवळ अनेक काडतुसेही दिसून येत आहेत.