Sanjay Shirsat : काजू-बदाम अधिकारी आणतात अन् बदनाम आम्ही

शेतकरी संकटात असताना दुष्काळावरील बैठकीत काजू-बदाम अधिकारीच आणून ठेवतात.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatPudhari
Published on
Updated on

Officials bring cashews and almonds and we are the ones who get defamed: Guardian Minister Shirsat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शेतकरी संकटात असताना दुष्काळावरील बैठकीत काजू-बदाम अधिकारीच आणून ठेवतात. उद्या कोणाच्या अंत्ययात्रेतही हे काजू-बदाम आणून ठेवतील. अधिकाऱ्यांच्या अशा अक्कलशून्य कारभारामुळे बदनामी आमची होते. असा संताप जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Sanjay Shirsat
Ganeshotsav 2026 : पैठण तालुक्यात ४८ गावांत 'एक गाव, एक गणपती'

पाऊसाने दडी मारल्याने मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. शेतातील पिके जळून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशी विदारक परिस्थितीवर चर्चेसाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी आयोजित विशेष बैठकीत चक्क नेते आणि वरिष्ठ अधिकारी काजू-बदामाचा खुराक घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाल्याने मोठी खळबळ उडाली. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांवर खापर फोडले.

Sanjay Shirsat
Sambhajinagar News : शासकीय वर्ग-२ जमिनींच्या मूल्यांकनावरून पेच

कोणत्या वेळेला काय करावे, हे अधिकाऱ्यांना समजत नाही. त्यांनी थोडं डोकं वापरलं पाहिजे. बैठक कशासंदर्भात आहे, काय चालेल. याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे, असा सल्लाही शिरसाट यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news