

Nylon Manja News Eighteen thousand students will take the oath today.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नायलॉन मांजामुळे नागरिक जखमी होत असून, काहींचे जीवही जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे एक प्रकारचे धारदार शस्त्र असून, त्याचा वापर बंद करा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले आहे.
त्यासोबतच आज महापालिका शाळेतील तब्बल १८ हजार विद्यार्थी एकाच वेळी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेणार आहेत. तसेच कोणीही वापरू नये यासाठी जनजागृतीही करणार आहेत.
नायलॉन मांजा वापरल्याने नागरिक जखमी होण्याच्या अनेक घटना घडत आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी नायलॉनच्या वापराविरोधात मोहीम सुरू केली आहे. नायलॉन मांजा वापरू नये, असे आवाहन दोन दिवसांपासून त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
तसेच या मोहिमेत आज (दि.१५) महापालिकेच्या सर्व शाळेत सकाळी परिपाठाच्या वेळेस मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापर्याबाबत शपथ देणार आहेत. यावेळी शाळेतील बालताई, सर्व शिक्षक उपस्थित असतील.
तसेच मनपाचे भारत तिनगोटे शिक्षणाधिकारी, रामनाथ थोरे विस्तार अधिकारी आणि ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी वेगवेगळ्या शाळेवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.